ताज्या घडामोडी

लोणावळा येथील टायगर पॉईंटवर गि-हाईक टपरीवर बोलावण्याच्या कारणावरुन हाणामारी

Spread the love

लोणावळा : लोणावळ्यातील प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ टायगर पॉईंट येथे आतवन गावच्या हद्दीत टपरीवर गि-हाईक बोलविण्याच्या कारणावरुन टपरी चालकांमधील दोन गटात परस्परांमध्ये लाकड़ी काठीच्या सहाय्याने मारहाण झाली.

ही घटना रविवार (दि.५) रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली.

लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर पॉईंट येथे टपरीवर गिहाईक बोलविण्याच्या कारणावरुन पहिल्या गटातील अक्षय किसन मोरे (वय २७, रा. कुरवडे ता. मावळ जि. पुणे), रोहित किसन मोरे (वय २१) व दुसऱ्या गटातील कौशल संगम बनसोडे (वय २८) रा. कुरवंडे ता. मावळ जि. पुणे, नितीन बबन झोरे (वय २३) रा. तुंगी ता. मावळ जि. पुणे, विकास बबन आखाडे (वय २१) रा. तुगी ता. मावळ जि. पुणे या टपरी चालक यांच्यात हाणामारी झाली . यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कायदा कलम 160 188 269 व साथीचे रोग अधिनियम कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी टपरीवर गि-हाईक बोलविण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणात लाठी – bकाठी व इतर साहित्याचा वापर करण्यात आला. पर्यटनबंदी असताना या ठिकाणी कोरोणा विषाणू प्रादुर्भावाच्या शासनाने आखून दिलेले नियमांचे उल्लंघन झाले . सार्वजनीक शांततेस बाधा येईल असे कृत्य करुन कायदा हातामध्ये घेतल्याने पोलीसांनी त्वरीत घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाची दखल घेतली.तसेच गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!