ताज्या घडामोडी

अंबाजोगाई : ईद व पाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर दुकाने रात्री १२ पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी

अंबाजोगाई शहरात येणाऱ्या ईद व गुढी पाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खरेदीसाठी अधिक वेळ मिळावा तसेच व्यापाऱ्यांना सणासुदीच्या काळात व्यवसाय करण्यास सोय व्हावी यासाठी बाजारपेठेतील दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अंबानगरीचे नगराध्यक्ष मा. नंदकिशोर (काकाजी) मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका रचना किशोरकुमार परदेशी (प्रभाग क्र. १०) यांनी पोलिस निरीक्षक मा. जोगदंड साहेब तसेच नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मा. प्रियंका टोंगे मॅडम यांना याबाबत निवेदन दिले. सणासुदीच्या काळात नागरिकांची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!