ताज्या घडामोडी

अंबाजोगाईत ‘एकदंत’ दंतचिकित्सा दवाखान्याचे थाटात उद्घाटन

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : अंबाजोगाई शहरातील तथागत चौक येथे डॉ. प्रशांत शिंदे यांच्या ‘एकदंत’ दंतचिकित्सा दवाखान्याचे उद्घाटन आज दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या उद्घाटन समारंभास महाराष्ट्र राज्याचे संचालक (वैद्यकीय) आदरणीय डॉ. अशोक (दादा) थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी सभापती मा. राजेसाहेब देशमुख, मा. बबन (भैय्या) लोमटे, युवा नेते सौरभ (भैय्या) सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच डॉ. अरुणाताई केंद्रे, डॉ. चंद्रकांत चव्हाण, डॉ. नरेंद्र काळे, डॉ. गोपाळ पाटील, डॉ. शरद साबळे, ॲड. विष्णुपंत सोळंके, ॲड. डांगे सर, ॲड. पद्मा कुपकर, मा. भिमसेन (आप्पा) लोमटे, प्रा. दिलीप राडकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास पत्रकार उत्तरेश्वर शिंदे, सरपंच योगेश (भैय्या) शिंदे, उपसरपंच बाळासाहेब घुगे, मा. तानाजी (दादा) शिंदे, डॉ. तेजस थोरात, माजी शेती अधिकारी विश्वंभर (तात्या) शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर, नागरिक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ. प्रशांत शिंदे यांच्या सामाजिक बांधिलकीचे व आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा दंतचिकित्सा सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. ‘एकदंत’ दवाखान्यामुळे अंबाजोगाई व परिसरातील नागरिकांना दर्जेदार व आधुनिक दंतसेवा उपलब्ध होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!