ताज्या घडामोडी

अपार कष्टातून घामाचे झाले मोती! केतन सतीश शिंदे यांची यशोगाथा; ग्लोबलच्या केळीची विदेशात निर्यात

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जिद्द, कसोटी आणि नवे बदल स्विकारण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळते आणि त्यातूनच केलेल्या कष्टाचे चीज होते. याचा अनेक उदाहरणातून अनेकांना प्रत्यय आलेला आहे. अशीच यशोगाथा युसुफ वडगाव (सादोळा) येथील शेतकऱ्यांची आहे. ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून येथील शेतकरी केतन सतिश शिंदे यांना अल्प दरात केळीची रोपे देण्यात आली, लागवडीपासून वेळोवेळी त्यांना केळी संगोपनाचे प्रशिक्षण देण्यात आले. शिंदे यांनी अपार कष्टाने हे पिक घेतले आणि जोपासले. त्यांनी गाळलेल्या घामाच्या प्रत्येक थेंबाचा आज मोती झाला असून त्याचा इतर शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा असे यश त्यांनी मिळवले आहे. जलनायक मयंक गांधी यांनी ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून देशाला बदलायचे स्वप्न पाहिले. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली तरच देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो असे त्यांचे ठाम मत आहे. आजमित्तीस संस्थेसोबत 40 हजार पेक्षा जास्त सक्रिय शेतकरी जोडले गेले असून, फळबाग लागवडीच्या माध्यमातून त्यांचे उत्पन्न दहा पटींनी वाढल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. केज तालुक्यातील युसुफ वडगाव (सादोळा) येथे संस्थेच्या मार्फत अनेक शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली असून, त्यांनी पिकवलेली उच्च दर्जाची केळी आता इराणला निर्यात होत आहे. केतन सतीश शिंदे हे त्यापैकीच एक शेतकरी आहेत. शिंदे यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये 55 गुंठे जमिनीवर 6 X 5 अंतरावर केळीची लागवड केली. लागवडीपासूनच निर्यात दर्जाचे उत्पन्न कसे घ्यावे? यासंदर्भात ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून मार्गदर्शन देण्यात आले. संस्थेच्या सिरसाळा येथील कृषीकुल या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रात त्यांना दोन दिवसीय केळी लागवड प्रशिक्षणही देण्यात आले. 55 गुंठे क्षेत्रात प्रति झाड 25 किलो प्रमाणे त्यांना उतारा आला असून, आत्तापर्यंत 18 टन केळीचे निर्यात दर्जाचे उत्पन्न झाले असून, पुढील काही दिवसांत जवळपास 20 टन केळीची काढणी करून निर्यात होईल अशी त्यांना दृढ अपेक्षा आहे. निर्यात झालेल्या केळीला प्रति किलो 18.5 एवढा दर मिळाला असल्याचेही शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. 🔸 ग्लोबल विकास ट्रस्टच्या सहकार्यामुळेच उत्पन्न वाढले - सतीश शिंदे ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून आम्हाला आमच्या बांधावरच थेट अल्प दरात रोपे मिळाली. माझा मुलगा केतन च्या नावे असलेल्या 55 गुंठे जमिनीवर आम्ही 2000 रोपांची लागवड केली. सुरुवातीला कृषीकुल येथे दोन दिवसांचे मोफत मार्गदर्शन आम्हाला मिळाले. त्याचबरोबर संस्थेच्या तज्ञांनी आम्हाला बांधावर येऊन प्रत्यक्ष निर्यात दर्जाचे उत्पन्न कसे घ्यावे यासंदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष मयंक गांधी सर आणि ग्लोबल विकास ट्रस्टने केलेल्या मदतीमुळे आमच्या उत्पन्नात कमालीची वाढ झाली. त्यांच्या सहकार्यामुळेच आमच्या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती आली असल्याची प्रतिक्रिया शेतकरी केतन शिंदे यांचे वडील सतीश शिंदे यांनी व्यक्त केली.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!