ताज्या घडामोडी

अंबाजोगाई | वार्ड क्रमांक 5 मध्ये पार्वतीबाई गंडले यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

अंबाजोगाई भरारी न्युज..नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक 5 मधून अपक्ष नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या सौ. पार्वतीबाई गंगाधर गंडले यांनी आज आपल्या प्रचाराची अधिकृत सुरुवात केली. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रचारादरम्यान समता नगर, शाहू नगर आणि छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अपक्ष उमेदवार असतानाही त्यांच्या मागे स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या प्रचार दौऱ्यात प्रहार संघटनेचे नेते अशोक भाऊ गंगाधर गंडले हे स्वतः घराघरात जाऊन मतदारांची भेट घेताना दिसले. त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या दैनंदिन अडचणी, पाणी, रस्ते, वीज, आरोग्य व स्वच्छतेसारख्या प्रश्नांची माहिती घेतली व त्यावर उपाययोजनांबाबत चर्चा केली. “जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. अनेक नागरिकांनीही विकासाच्या अपेक्षा व्यक्त करत पार्वतीबाई गंडले यांना पाठिंबा दर्शविला. दरम्यान, वार्ड क्रमांक 5 मधील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, येणाऱ्या निवडणुकीत ही लढत महत्त्वाची ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!