ताज्या घडामोडी

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा लोक विकास महाआघाडीस बिनशर्त जाहीर पाठिंबा* *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पाठिंब्याने पापा मोदींचा जनाधार वाढला*

अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई नगरपरिषदेच्या निवडणूकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटा) चा राजकिशोर मोदी व पृथ्वीराज साठे यांच्या लोक विकास महाआघाडीला स्थानिक पातळीवर जाहीर पाठिंबा दिला आहे. भाजप समर्थक विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता सुज्ञ मतदारांनी लोक विकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी व सर्वच प्रभागातील नगरसेवकपदाच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटा) च्या वतीने अंबाजोगाईतील सर्व जनतेला करण्यात आले आहे. नुकताच आर.पी.आय आठवले गट व लोकविकास आघाडीची एक संयुक्त बैठक होऊन त्यात आरपीआयच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजकिशोर मोदी व पृथ्वीराज साठे यांनी जाहीर असा पाठिंबा व्यक्त केला आहे. या बैठकीत राजकिशोर मोदी व माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्यासह आरपीआयचे दीपक कांबळे, महेंद्र निकाळजे, रमेश गायसमुद्रे, प्रमोद दासूद, रईसोद्दीन अन्सारी, शेख मुबारक, महेंद्र कांबळे, दीपक बडे, भाऊराव होके यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आरपीआय (आठवले गट) चे दीपक कांबळे यांनी लोक विकास महाआघाडीला जाहीर पाठींबा व्यक्त करताना सांगितले की, सत्ताधाऱ्यांनी अंबाजोगाई शहरात फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. कुटुंब फोडून आपली राजकिय पोळी भाजून घेण्यातच ते धन्यता मानत असल्याचे दिपक कांबळे यांनी सांगितले तर याउलट राजकिशोर मोदी यांनी त्यांच्या ३५ ते ४० वर्षांच्या राजकारणात कधीही फोडाफोडीचे राजकारण न करता केवळ त्यांनी विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या याच समाजकारनावर प्रभावित होऊन आम्ही सर्व स्थानिक पदाधिकारी मिळून लोक विकास महआघाडीला बिनशर्त असा पाठिंबा जाहीर करत असल्याचे सांगितले. या बैठकीत महेंद्र निकाळजे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. जातीयवादी शक्तिला रोखून अंबाजोगाई शहराची संस्कृती जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी याप्रसंगी आवर्जून सांगितले. राजकिशोर मोदी यांनी आज सर्व धर्मनिरपेक्ष पक्षानी एकत्र येऊन अंबाजोगाई शहर कशा पद्धतीने गुण्यागोविंदाने राहील यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन उपस्थित सर्व समाजबांधवाना केले. तर माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी देखील उपस्थित समाज बांधवांना लोक विकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांच्यासह सर्वच नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना मतदानरूपी आशिर्वाद द्यावेत असे आवाहन केले. लोक विकास महाआघाडीच्या माध्यमातून अंबाजोगाई शहराचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहूत असे अभिवचन याप्रसंगी राजकिशोर मोदी व पृथ्वीराज साठे यांनी सर्वांना दिले.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!