ताज्या घडामोडी

तोतया पत्रकारांच्या बनावट लेटर हेडचा पर्दाफाश : मकोका अंतर्गत संघटित गुन्हेगारीची कारवाई होणार का ? बनावट पत्रकारावर कारवाई करण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी

पत्रकारितेच्या बुरख्याआडून अधिकारी आणि जनतेला वेठीस धरणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई व्हायला हवी ! केज :- ज्या वर्तमानपत्र आणि नियतकालिकांची कुठेही रीतसर नोंदणी नसताना आणि अधिकृत मान्यता नाही; अशा बोगस व बनावट पत्रकार संघ यांच्या नावाने त्याचे लेटर हेड बनवून सरकारी कार्यालयातून दिवाळी भेट उकळणाऱ्या पत्रकारावर कठोर कारवाई करण्याची मागणी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. बाबासाहेब मस्के यांनी केज तहसीलदार यांनना एक निवेदन दिले आहे. त्यांनी प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (PRGI) कार्यालयात रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया (RNI) क्रमांक नसलेल्या बोगस वृतपत्राच्या आधारे अधिकारी, कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तोतया पत्रकारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की, भारताच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर समाजाचा मोठा विश्वास आहे. परंतु काही समाजकंटक व्यक्ती या व्यासपीठाचा गैरवापर करून समाजाची तसेच प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. केज शहरातील फुले नगर परिसरातील तात्या गवळी नावाच्या व्यक्तीने बोगस बातम्या तयार करून, आर एन आय क्रमांक नसलेल्या एका ॲपच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या नावाने खोट्या बातम्या प्रसारित केल्या आहेत. सदर व्यक्ती स्वतःला पत्रकार असल्याचे भासवून नागरिकांशी तसेच सरकारी अधिकाऱ्यांची फसवणूक करीत आहे. त्याने स्वाभिमानी पत्रकार संघ या नावाने एक बोगस पत्रकारांची संघटना तयार करून स्वतःला अध्यक्ष घोषित केले आहे. त्या पदाचा गैरवापर करून विविध ठिकाणी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडेच त्याने दीपावली निमित्त त्याच्या संघटनेच्या बनावट लेटरहेडचा वापर करून अवैद्यरित्या अधिकाऱ्यावर दबाव निर्माण करून व धाक दाखवून पैसे उकळले असल्याचे निदर्शनास आले आहे. या तात्या गवळी आणि त्याचे सहकारी असलेल्या तोतया पत्रकाराची ही कृती पत्रकारितेच्या प्रतिमेला धोका पोहोचवणारी असून, समाजात तसेच प्रशासनात संभ्रम व फसवणुकीचे वातावरण निर्माण करणारी आहे. म्हणून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून, संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली असून निवेदनावर बाबासाहेब अंबादास मस्के यांची स्वाक्षरी आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलिस निरीक्षक यांना दिल्या आहेत. या निवेदना सोबत पत्रकारांची यादी आणि RNI नसलेल्या वर्तमानपत्रांचे कात्रणे जोडली आहेत.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!