तळेगावमध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा
तळेगाव : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमानाने तळेगावमध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत 51 दिव्यांग बांधवांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच औषध वाटप करण्यात आले. दिव्यांग व्यक्तींना बक्षीसे देण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे सीआरपीएफचे कमांडर एम.बी. सिंह, कमांडर राजेंद्र प्रसाद यांनी मार्गदर्शन केले. तसेच सुधीर भागवत, मिनीता पाटील, ज्योती आधारकर मिंडासस्पर्क फाउंडेशनचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष राजेश गाडे यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन मिलिंद निकम व सह प्रोजेक्ट चेअरमन प्रदीप टेकवडे तानाजी मराठे यांनी काम पाहिले. रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे, संजय मेहता यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले. तसेच शाईन शेख व दीपक फल्ले यांची बहुमूल्य साथ मिळाली.
आरोग्य तपासणी साठी व मोफत औषध देण्यासाठी डॉ. सौरभ मेहता, डॉ. मधुरा निकम, डॉ. रोहित मणियार, डॉ. सुरभी मेहता व स्वप्नाली मेहता यांनी पुढाकार घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरयु देवळे व प्रदीप टेकवडे यांनी केले. आभार प्रदर्शन तानाजी मराठे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रेश्मा फडतरे, वैशाली खळदे, रिजवान शेख व सर्व रोटरीयन्स व सीआरपीएफचे जवान यांनी महिन्यात घेतली.



