आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

न्यू व्हिजन पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा 🌿 “एक पृथ्वी, एक स्वास्थ्य” या थीमनुसार योगगुरूंच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी साधला योगमार्ग

अंबाजोगाई भरारी न्युज उत्तरेश्वर शिंदे दि. 21 जून 2025 रोजी श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू व्हिजन पब्लिक स्कूल, अंबाजोगाई येथे ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्धतेने साजरा करण्यात आला. “एक पृथ्वी, एक स्वास्थ्य” या जागतिक संकल्पनेतून योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख योग मार्गदर्शक म्हणून श्रीमती डॉ. आकांक्षा वट्टमवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना योगासने, प्राणायाम व ध्यान याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. त्यांना डॉ. शितल घुले व वैष्णवी पवार या सह मार्गदर्शकांनी साथ दिली. योग सत्रात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध विभागांचे प्राचार्य आणि शाळेतील विद्यार्थी यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक सचिव श्री. राजकिशोर मोदी उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून निरोगी आरोग्यासाठी योगाच्या सातत्याचे महत्त्व विशद केले. संस्थेचे कार्यकारी संचालक श्री संकेत भैया मोदी, मार्गदर्शक बी. आय. खडकभावी, वसंत चव्हाण, डी. एच. थोरात, तसेच प्राचार्य प्रशांत कुमार यांनी योग शिक्षकांचा सन्मान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमास पालक, पालक-शिक्षक संघटनेचे सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण योग दिनाच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण झाली असून, दररोजच्या जीवनात योगाचा समावेश करण्याचा संकल्पही विद्यार्थ्यांनी केला.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!