आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
न्यू व्हिजन पब्लिक स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव: बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने गुणवंतांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.
अंबाजोगाई भरारी न्युज... श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाजोगाई यांच्या वतीने न्यू व्हिजन पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावी, बारावी तसेच NEET, JEE व CET परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उच्च टप्प्यावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. इयत्ता बारावीमध्ये विशेष यश मिळवलेले विद्यार्थी: 🔹 पुनम दत्तात्रय चव्हाण – ८९.४०% 🔹 तेजस्वीनी चंद्रकांत पांचाळ – ८८.२०% इयत्ता दहावीतील गुणवंत: 🔹 अभिनव अविनाश मुंडे – ९८.२०% 🔹 सार्थक रत्नेश लोहिया – ९८.००% NEET परीक्षेत विशेष कामगिरी करणारे विद्यार्थी: १. विराज गणेश तर्के – ५८७ गुण २. पौर्णिमा प्रवीण देशमुख – ५१७ गुण ३. भाग्यश्री सातपुते – ५०२ गुण ४. अलीम शेख – ५०० गुण ५. श्रद्धा सचिन दरगड – ४४८ गुण ६. करुणा रवींद्र मुंदडा – १७४ गुण (दृष्टीहीन विद्यार्थिनी) सीईटी परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी: 🔹 वेदांत सुजित दिक्षित – ९९.८८ टक्के या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशामध्ये त्यांच्या शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच ही मुले आज घवघवीत यशाच्या शिखरावर पोहोचली आहेत. यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंदांचा देखील सन्मान करण्यात आला. न्यू व्हिजन पब्लिक स्कूल ही CBSE बोर्डाशी संलग्न असलेली संस्था असून अंबाजोगाई परिसरातील विद्यार्थी दर्जेदार शिक्षणासाठी या संस्थेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. अनेक विद्यार्थी आज या शाळेच्या माध्यमातून वैद्यकीय, अभियांत्रिकी, विज्ञान व व्यावसायिक क्षेत्रात उज्वल भविष्य घडवत आहेत. या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव श्री. राजकिशोरजी मोदी होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्यकारी संचालक श्री संकेत भैया मोदी, श्रीमती सौ.डिंपल संकेत मोदी, मार्गदर्शक श्री बी.आय. खडकभावी, ॲड. संतोष पवार, श्रीमती सविता बुरांडे (बनाळे) आणि न्यू व्हिजन पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री एम. प्रशांतकुमार आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना श्री. राजकिशोरजी मोदी म्हणाले, अंबाजोगाई परिसरातील होतकरू मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याची संधी मिळाल्यामुळे आम्ही स्वतःला धन्य समजतो. या मुलांनी आज शाळेचे आणि शहराचे नाव उज्वल केले आहे. त्यांचे पुढील शिक्षण आणि आयुष्य अधिक उज्ज्वल होवो, हीच सदिच्छा! कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी पद्धतीने पार पडले. उपस्थित पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडून संस्थेच्या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.




