आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

उत्तरेश्वर शिंदे यांची ‘स्वराज्य शक्ती सेने’च्या केज-अंबाजोगाई सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती

केज प्रतिनिधी | भरारी न्यूज स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष सौ. करुणाताई मुंडे यांनी केज तालुक्यातील प्रसिद्ध पत्रकार उत्तरेश्वर शिंदे यांची केज व अंबाजोगाई तालुक्यांचे सोशल मीडिया प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. याप्रसंगी करुणाताई मुंडे यांच्या हस्ते शिंदे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. संघटनेच्या सामाजिक व राजकीय घडामोडी प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संघटनेचा विस्तार करण्यासाठी शिंदे यांच्यावर ही महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उत्तरेश्वर शिंदे हे पत्रकारितेत गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असून, ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न मांडणारा निडर पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी त्यांनी शेती, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक प्रश्नावर प्रभावी भूमिका बजावली आहे. "स्वराज्य शक्ती सेनेच्या कार्याचा व्यापक प्रचार-प्रसार करून, करुणाताई मुंडे यांनी माझ्यावर ठेवलेली विश्वासाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गरीब, कष्टकरी व शेतकरी वर्गाचे प्रश्न शासन दरबारी पोहोचवण्याचे काम प्रामाणिकपणे करीन," असे शिंदे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, "संघटनेच्या माध्यमातून येत्या काळात विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातील. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून संघटनेचे कार्य देशभर पोहोचवूया." करुणाताई मुंडे यांनी यावेळी येत्या काळात संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या कार्यक्रमांना वेळेवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. संघटना अधिक बळकट होऊन, स्थानिक जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली जाईल, असा विश्वास सर्व संघटनेच्या पदअधिकाऱ्यांना दिला. --- ✍️ बातमीसाठी संपर्क: उत्तरेश्वर शिंदे सोशल मीडिया प्रमुख – केज, अंबाजोगाई स्वराज्य शक्ती सेना

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!