आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शिवराज्यभिषेक सोहळ्याला बीडसह महाराष्ट्रातील शिवप्रेमिंनी उपस्थित रहा- गंगाधर काळकुटे पाटील रायगडावर मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची मागणी

बीड | प्रतिनिधी रायगडावर होणाारा शिवराज्यभिषेक सोहळ्यामित्ति ६ जून रोजी ‘लोकोत्सव’ ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहीरांचा.. स्वराज्याच्या इतिहासाचा’ व ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या आकर्षण ऐतिहासिक सोहळ्याचे बीडसह महाराष्ट्रातील शिवप्रेमिंनी साक्षिदार व्हावे असे अवाहन शिवराज्यभिषक सोहळा समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे पाटील यांनी केले. चौंडीच्या धर्तीवर रायगडावरही मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. बीड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे शनिवार दि. ३१ मे रोजी दुपारी १ वाजता पत्रकार परिषदेचे अयोेजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी ऋषिकेश बेदरे पाटील, गोपाळ धांडे, संजय गोडसे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना गंगाधर काळकुटे पाटील म्हणाले की, रायगडावर विविध विकास कामे व्हावेत यासाठी चौंडीच्या धर्तीवर रायगडावरही मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात यावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. या मागणीची शासनाने दखल घ्यावी. शिवरायांच्या प्रेरणेने मर्द मराठ्यांच्या तलवारी याच मातीत तळपल्या आणि स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. हजारो मावळ्यांच्या, सर्वसामान्यांच्या बलिदानातून महाराष्ट्रभूमी पावन ज्ञाली. दुर्गराज रायगडावर शिवरायांचा ६ जून १६७४ ला ‘राज्याभिषेक’ झाला. मोठ्या थाटामाटात राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला. जन् सार्वभौम राज्य स्थापन झाल्याची द्वाही दाहीदिशा फिरली. या ऐतिहासिक क्षणाची स्मृती सदैव राहावी, या हेतूने प्रतिवर्षी ६ जून रोजी दुर्गराज रायगडावर भव्य प्रमाणात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दुर्गराज रायगडावर ५ व ६ जून २०२५ रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होत आहे. तरी बीडसह महाराष्ट्रातील शिवप्रेमिंनी उपस्थित रहावे असे आवाहन गंगाधर काळकुटे पाटील यांनी केले. ----- चौकट..... असे असतील कार्यक्रम शिवराज्याभिषेक सोहळा | जागर शौर्य भक्तीचा | गुरुवार, दि. ५ जून २०२५ दुपारी ०३.३० वा. राजमाता जिजाऊ साहेब यांच्या समाधीस अभिवादन करून शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ (जिजाऊ समाधी स्थळ, पाचाड) दुपारी ४.वा.-युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत व शिवभक्तांच्या समवेत पायी गड चढण्यास प्रारंभ (स्थळ नाणे दरवाजा) दुपारी ०४.१५ वा. गडपूजन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती व रायगड जिल्हा प्रशासन यांच्या उपस्थितीत, (स्थळः नगारखाना)दुपारी ०४.३० वा. युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती महाराज यांच्या हस्ते ’धार तलवारीची.. युद्धकला महाराष्ट्राची.... युद्धकलेच्या प्रात्यक्षिकास प्रारंभ (स्थळः होळीचा माळ) सायं. ०७.०० वा. ढोलवादन, लेझीम प्रात्यक्षिके व वारकरी संप्रदायाकडून टाळ मृदंगाचा गजर (स्थळः होळीथा माळ) रात्री ०८.०० वा. जागर शिवशाहिरांचा.. स्वराज्याच्या इतिहासाचा... (स्थळः राजसदर) रात्री ०१.०० वा. गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ (स्थळ: शिरकाई मंदिर) रात्री ०९.३० वा. वारकरी संप्रदायाकडून कीर्तन व भजन (स्थळः अगदीश्वर मंदिर) शुक्रवार, दि. ६ जून २०२५ सकाळी ०७.०० वा. युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे शुभहस्ते पारंपारिक वाद्यांच्या गजरात ध्वजपूजन व ध्वजारोहण (स्थळः नगारखाना) सकाळी ०७.३० वा. शाहिरी कार्यक्रम (स्थळः राजसदर) सकाळी ०९.३० वा. श्री शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन सकाळी ०९.५० वा. - युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे राजसदरेवर आगमन सकाळी १०.०० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते श्री शिवछत्रपती महाराजांच्या उत्सवमूर्तीस अभिषेक सकाळी १०.२० वा. श्री शिवछत्रपती महाराजांच्या राजसदरेवरील सिंहासनारूढ मूर्तीस सुवर्ण मुद्रांचा अभिषेक सकाळी १०.३० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे शिवभक्तांना संबोधन सकाळी ११.०० वा. ’सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा शिवराज्याभिषेक’ पालखी सोहळ्यास प्रारंभ दुपारी १२.०० वा. श्री शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे जगदीश्वर मंदिर येथे आगमन दुपारी १२:१५ वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्याकडून वारकरी संप्रदायास पंढरीच्या वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान (स्थळः जगदीश्वर मंदिर) दुपारी १२.२५ वा. श्री शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस अभिवादन

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!