आपला जिल्हामहाराष्ट्र
गोडव्याची परंपरा जपणारे दोन भाऊ – अंबाजोगाईतील हरियाणा जिलेबीचा ब्रँड!
भरारी न्युज.अंबाजोगाई. हरियाणाहून अंबाजोगाईसारख्या छोट्या शहरात येऊन आपल्या हातांनी तयार केलेल्या जिलेबीने स्थानिक नागरिकांच्या मनात गोडवा निर्माण करणाऱ्या सुरेश राठोड व शेखर महेरा या दोन भावंडांनी जिलेबी व्यवसायात ३० वर्षांची परंपरा निर्माण केली आहे. हरियाणाच्या चवदार जिलेबीचा गोडवा आता अंबाजोगाईकरांच्या रोजच्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. या दोन भावंडांनी सुरुवातीला केवळ पोटासाठी व्यवसाय सुरू केला, परंतु त्यांच्या मेहनतीमुळे व उत्कृष्ट चवीमुळे त्यांची स्पेशल हरियाणा जिलेबी अंबाजोगाईसह आसपासच्या परिसरात लोकप्रिय झाली. त्यांच्या जिलबीत साधी जिलेबी आणि खवा जिलेबी असे दोन प्रकार असून, त्यांच्या खास चवीमुळे प्रत्येक कार्यक्रम व उत्सवात त्यांचीच मागणी असते. गुणवत्तेची हमी, स्वच्छता व शुद्ध तेलाचा वापर हे त्यांच्या यशाचे रहस्य आहे. कोणताही उत्सव, लग्नसमारंभ किंवा कार्यक्रम असला तरी हरियाणा जिलेबीचा गोडवा लोकांच्या मनात आणि जिभेवर कायम असतो. अंबाजोगाईतील प्रत्येक कुटुंबासाठी सुरेश व शेखर हे केवळ जिलेबीवाले नाहीत, तर आपलेपणाने जोडलेले आहेत. या ३० वर्षांच्या प्रवासात त्यांनी केवळ गोडव्याचा व्यवसाय केला नाही, तर लोकांच्या मनात स्थान मिळवले. त्यांची खवा जिलेबी व साधी जिलेबी आजही ग्राहकांना उत्कृष्ट चव आणि समाधानाचा अनुभव देते. त्यांच्या मेहनतीची गोड फळे आज अंबाजोगाईच्या प्रत्येक तोंडात विरघळत आहेत. हरियाणाहून अंबाजोगाईपर्यंत पोहोचलेला हा गोडव्याचा प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे!
