ताज्या घडामोडी

दहा ऑगस्ट, हा दिवस म्हणजे आदरणीय कृष्णराव भेगडे सरांचा वाढदिवस.

न तक्त है न ताज है फिर भी सबके दिलो पे जिनका का राज है वही हमारे सबके सरताज है" .. डॉक्टर शाळीग्राम भंडारी...

Spread the love

दहा ऑगस्ट हा दिवस म्हणजे आदरणीय कृष्णराव भेगडे सरांचा वाढदिवस.

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे १० ऑगष्ट.

आपापल्या क्षेत्रात विलक्षण उंचीवर असलेल्या अनेक व्यक्तींचा सहवास या निमित्ताने आपल्याला घडतो हेच आपल्या दृष्टीने या 10 ऑगस्टच वैशिष्ट्य आहे. जगात दोन प्रकारची माणसं असतात एक असतात, सूर्यासारखी अत्यंत तेजस्वी ते इतरांचं आयुष्य प्रकाशमान करतात स्वतःच्या तेजाने, पण दुसऱ्या प्रकारची माणस असतात ती बोधिसत्वा सारखी की जे स्वतः कष्ट करतात, संघर्षाला सामोरे जाता, एक आदर्श निर्माण करतात आणि इतरांच आयुष्य प्रकाशमान करतात.

त्या आपल्या आदर्श तेजान असंच काहीस बोधिसत्वा सारखं आयुष्य जगणारे आहेत आपले कृष्णराव भेगडे साहेब.
मावळ परिसरातील शैक्षणिक औद्योगिक आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक संस्थांचे ते गेली अनेक वर्ष निस्वार्थ भावनेने यशस्वी असं नेतृत्व करीत आहेत.
आज त्यांच्याकडे कुठलंही पद नाही म्हणूनच भेगडे सर आपल्यासाठी शायर चे शब्द आहेत-

न तक्त है न ताज है फिर भी सबके दिलो पे जिनका का राज है वही हमारे सबके सरताज है”

अशा भेगडे सरांना त्यांना त्यांचं आयुष्य निरोगी आणि निरामय लाभो हीच त्या निर्गुण निराकार परमेश्वर चरणी आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना व शुभेच्छा ..

आपला स्नेहांकित लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!