आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी
संविधान थोरात संभाजीराव बडगिरे उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कला शाखेतून दुसरा
ममदापूर ५ : (वार्ताहर) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचा निकाल जाहिर झाला असून संभाजीराव बडगिरे उच्च माध्यमिक विद्यालय , ममदापूर ता. अंबाजोगाई येथील कला शाखेचा निकाल १००% टक्के लागला आहे. संविधान थोरात याने कला शाखेतून दुसरा येण्याचा मान मिळविला आहे. कला शाखेतून सानिका संतोष बुरगे हिने ८१.८३ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर संविधान संदीप थोरात याने ८१.५० टक्के गुण घेऊन व्दितीय क्रमांक मिळविला आहे. तर रोहिणी बाळू सरवदे हिने ७९.१७ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष डॉ. आनंदराव बडगिरे , अध्यक्ष डॉ. अनिल कोल्हे , सचिव डॉ. अमोल बडगिरे , प्राचार्य कल्याण देवधारे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.




