आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंबाजोगाईत हॉटेल व्यवसायिकांना नियमबाह्य गॅस टाक्या कशा मिळतात? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह! प्रशासनाचे दुर्लक्ष की आर्थिक देवाणघेवाण?

भरारी न्युज..अंबाजोगाई शहरात इंडेन गॅस, भारत गॅस आणि एचपी गॅसच्या अधिकृत एजन्सी कार्यरत असताना, हॉटेल व्यवसायिकांकडे केवळ लाल रंगाच्या व्यावसायिक गॅस टाक्याच दिसत आहेत. विशेष म्हणजे, मोरेवाडी परिसरातील एका हॉटेलवर दोन लाल टाक्या वापरताना दिसून आल्या, ज्यामुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. सामान्य ग्राहकांना टाकीसाठी ऑनलाईन नंबर, मग हॉटेल व्यावसायिकांना सवलती का? जेव्हा सामान्य नागरिक गॅस एजन्सीकडे जाऊन टाकीसाठी विचारणा करतात, तेव्हा त्यांना ऑनलाईन नंबर लावण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, या हॉटेल व्यवसायिकांना अशा लाल टाक्या कुठून आणि कशा मिळतात, हा मोठा प्रश्न आहे. नागरिकांना टाकी मिळवण्यासाठी विविध नियमांचे पालन करावे लागते, परंतु काही हॉटेल व्यवसायिकांकडे या टाक्या सहजगत्या कशा पोहोचतात? गॅस एजन्सी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय शहरातील काही एजन्सी धारक नियमांचे उल्लंघन करून हॉटेल व्यवसायिकांना थेट व्यावसायिक गॅस टाक्या पुरवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये प्रशासनाची भूमिका देखील संशयास्पद वाटते. सामान्य नागरिकांना गॅस टाकीसाठी प्रतीक्षा करावी लागते, तर या हॉटेल व्यवसायिकांना कुठल्या नियमाखाली आणि कोणत्या मार्गाने टाक्या पुरविल्या जातात, याचा शोध घेण्याची गरज आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष की आर्थिक देवाणघेवाण? गॅस टाक्यांचे वाटप कसे चालते, यावर प्रशासनाचे नियंत्रण असले पाहिजे. मात्र, काही हॉटेल व्यवसायिकांकडे मोठ्या प्रमाणात गॅस टाक्या साठवलेल्या आढळून येत असल्याने, या टाक्या अधिकृत मार्गाने मिळतात की कुठल्या एजन्सीधारकांच्या संगनमताने काळ्या बाजारातून पुरवल्या जातात, याची चौकशी होणे अत्यावश्यक आहे. स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी केली नाही, तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी अधिक रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. संबंधित गॅस एजन्सी आणि हॉटेल व्यवसायिकांवर कारवाई करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!