आपला जिल्हाताज्या घडामोडी
जिल्हा वाहतूक शाखेची अंबाजोगाई शहरात कारवाई 95 केसेस करून 72 हजाराचा दंड
अंबाजोगाई/ प्रतिनिधी भरारी न्युज. बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, जिल्हा वाहतूक शाखेचे स.पोलीस.नि. सुभाष सानप, अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहरांमध्ये कारवाई करून बुलेटचे आठ सायलेन्सर काढून जप्त केले याबरोबरच 95 केसेस करून 72 हजाराचा दंड केला. ही कारवाई सोमवारी शिवाजी चौक, तथागत चौक आदी भागात करण्यात आली. बीड जिल्हा वाहतूक शाखेने सुभाष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहरात वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक हनुमंत घोडके, वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार क्षीरसागर, जावळे, दराडे, काकडे ,चालक पोलीस हवालदार हारके, यांच्यासह अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर रोडे, पो.काॅ. पारवे,पो.काॅ. फड महिला पोलीस कॉन्स्टेबल सारिका साळुंके यांनी सोमवारी अंबाजोगाई शहरातील शिवाजी चौक, तथागत चौक या भागात कारवाई करून ठोठो आवाज करणाऱ्या बुलेटचे आठ सायलेन्सर जप्त केले. याशिवाय या भागात 95 केसेस करून बहात्तर हजार रुपयांचा दंड केला. यामध्ये लायसन नसणे, गाडीची नंबर प्लेट फॅन्सी असणे, कागदपत्र जवळ नसणे आदी बाबींचा समावेश आहे. ही कारवाई सकाळी 12 वाजता सुरू झाली ती दुपारी 2.30 पर्यंत चालली. यानंतरही कारवाई सुरूच राहील अशी माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांनी दिली.




