आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बीड जिल्ह्याचे नाव कलाक्षेत्रात अधोरेखित करणारा कलावंत – नामदेव काकडे ————————— नामदेव काकडे यांच्या जहांगीर आर्ट ऑफ गॅलरी येथील चित्र प्रदर्शनीने रसिकांना आकर्षित केले.

बीड जिल्हा संतांची भूमी तशिच ती कलावंतांची खाण म्हणूनही ओळखली जाते. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या जिल्ह्याने आजपर्यंत अनेक नामवंत कलावंत विविध कलाक्षेत्राला दिलेले आहेत. यापैकीच एक नाव म्हणजे नामदेव काकडे.. अगदी अल्पावधीत देश विदेशामध्ये आपल्या चित्रशैलीने रसिकांच्या मनामध्ये स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या बनसारोळा ता. केज येथील मनस्वी चित्रकार ,शिल्पकार नामदेव काकडे यांच्या परिवारामध्ये कुठलीही कलात्मक पार्श्वभूमी नसताना लहानपणापासून कुंचल्याचं वेड असणाऱ्या नामदेवने जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर कलेच्या क्षेत्रात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलेल आहे. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे लहानपणापासूनच नामदेव निसर्गाच्या सानिध्यात वाढलेला. फरक एवढाच की आपण निसर्ग न्याहाळतो आणि मनस्वी आनंद घेतो. परंतु नामदेवने मात्र निसर्गाच लोभसवान रूप मनात साठवून कुंचल्याच्या रूपाने कागदावर चितारायला सुरुवात केली. लहानपणी असणार कुंचल्याचं आकर्षण मोठेपणी आपली जगामध्ये स्वतंत्र ओळख निर्माण करून देईल याची पुसटशीही कल्पना कदाचित लहानग्या नामदेवला नसेल.. निसर्गाने दिलेलं कलेचे वरदान सातत्याने जपत जपत नामदेव लहानाचा मोठा झाला. आणि हेच सातत्य नामदेवाला कलेच्या विशिष्ट उंचीवर नेऊन पोचवायला कारणीभूत ठरलं. संपूर्ण जगाचं आकर्षण केंद्र असणाऱ्या मुंबईसारख्या मायानगरीत आपल्याही कलेचा उद्धार व्हावा असं प्रत्येक कलावंताचं स्वप्न असतं. त्यातल्या त्यात चित्रकार शिल्पकार यांच्यासाठी जहांगीर आर्ट ऑफ गॅलरी हे ठिकाण म्हणजे जणू पंढरीच.. या जहांगीर गॅलरीमध्ये आपल्या चित्रांचं शिल्पांचं प्रदर्शन भराव आणि रसिकांनी या कलेचा आनंद घेऊन आपल्या कलेच कौतुक करावं असं प्रत्येक कलावंताची मनोमन इच्छा असते. या जहांगीर आर्ट ऑफ गॅलरीमध्ये दिनांक सहा जानेवारी 2025 ते 12 जानेवारी 2025 असे सलग सात दिवस चित्रकार नामदेव काकडे यांच्या चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे नामदेव काकडे यांच्या कलाकृतीचे यापूर्वीही जहांगीर आर्ट ऑफ गॅलरी या ठिकाणी प्रदर्शन झालेले आहे आणि रसिकांनी उदंड प्रतिसादही दिलेला आहे. परंतु यावर्षी त्यांच्या कलाकृतींना मिळालेला प्रतिसाद पाहून आपल्या बीड जिल्ह्याचे नाव कला विश्वात अधोरेखित करण्याचे काम चित्रकार शिल्पकार नामदेव काकडे यांनी केल आहे यात काही शंकाच नाही. कला विश्वातील अनेक नामवंत व्यक्तिमत्त्वांनी नामदेव काकडे यांच्या चित्र प्रदर्शनीला भेट देऊन त्यांचं कौतुक केलंच परंतु अनेक कलासक्त उद्योग जगतातील नामवंत व्यक्तींनीही नामदेव काकडे यांच्या कलाकृती आपल्या वैयक्तिक दालनात असाव्यात यासाठी मूल्य देऊन अनेक कलाकृती खरेदी केल्या. यामध्ये सर जेजे आर्ट स्कूलचे मूर्तिकला विभागाचे प्रमुख श्री मधुकर वंजारी ,अनुपम बनारसे, जगविख्यात चित्रकार सुहासजी बाहुलकर, राजेंद्र मेहता, नामवंत चित्रकार यशवंत देशमुख, श्री दत्तात्रेय पाडेकर श्री प्रकाश वाघमारे श्री तुकाराम जाधव श्री विशाल नामदेव श्री गणेश चौगुले श्री शिवानंद मोरे श्री नामदेव नागरे श्री पंडित सर श्री विजयराज बोधनकर श्री प्रकाश राजेशिर्के इत्यादी नामवंत रसिकांनी नामदेव काकडे यांच्या चित्रपट भेट दिली आणि कौतुक केले. सर जेजे ऑफ आर्ट स्कूलचे पदवीधर असणारे नामदेव काकडे यांच्या कलाकृती बद्दल लेखक आणि चित्रपट निर्माते सी एस नाग यांनी अत्यंत प्रभावी भाषेत वर्णन केले आहे. नामदेव काकडे यांच्या कलाकृती म्हणजे पारंपारिक आणि आधुनिक चित्रशैली यांचे रोमांचक मिश्रण असून भडक ऍक्रेलिक रंगांमध्ये विपुल स्वरूपांच्या समृद्ध टेपेस्ट्रीचे भव्य दर्शन यामधून रसिकांना होते.जाड इम्पास्टोमध्ये प्रतीकात्मक आणि शैलीकृत फॉर्मचे कल्पनारम्य मिश्रण वापरून रमणीय लँडस्केप त्यांनी तयार केले आहे ज्यामध्ये पाहणाऱ्यांना स्वप्नवत प्रतिमा जाणवते.अमूर्त अभिव्यक्तीवादाचा संपूर्ण पॅलेट वापरून, नामदेव त्याच्या "लोटस" मालिकेत आनंद आणि आनंदाने भरलेले फँटस्मगोरियाचे जग तयार करतात, जिथे निर्मितीची प्रत्येक कृती धडधडणाऱ्या चैतन्य आणि निर्दोष आश्चर्याने भरलेली असते. वास्तविकतेच्या निरपेक्ष स्वरूपाचे खंडित दृष्टिकोन न ठेवता सर्वसमावेशक आणि अध्यात्मिक घटक नामदेव काकडे यांच्या चित्रशैलीमध्ये आढळून येतात. एका मनस्वी कलावंताने दुसऱ्या कलावंताचे तोंड भरून केलेले हे कौतुक निश्चितच बीड जिल्हावासीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरलेल्या चित्रकला आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून नामदेव काकडे यांनी आपल्या बीड जिल्ह्याचे नाव संपूर्ण कला विश्वामध्ये अधोरेखित केले आहे. अशा या हरहुन्नरी मनस्वी चित्रकारास भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. तालमार्तंड प्रकाश बोरगावकर

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!