आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
एस. एस.ग्रुप ऑफ मॅथेमॅटिक्स, अंबाजोगाई कोचिंग क्लासेस चे सहा विद्यार्थी शासकीय अभियांत्रिकी प्रवेशास पात्र.
अंबाजोगाई.( प्रतिनिधी ). सचिन जोगदंड. अंबाजोगाई हे पहिल्यापासून शिक्षणाचे माहेरघर मानले जाते त्यात एस एस ग्रुप ऑफ मॅथमॅटिक्स कोचिंग क्लासेस द्वारे एक मानाचा तुरा रोवण्यात यश आले असून महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा 2023- 24 अंतर्गत झालेल्या परीक्षेत कोचिंग क्लासेस चे सहा विद्यार्थी अनुक्रमे चि. अंजान आदित्य ( शासकीय अभियांत्रिकी छ.संभाजीनगर ), चि. धपाटे अजय (शा.अभियांत्रिकी, जळगाव), चि. शिनगारे स्वप्निल (शा. अभियांत्रिकी, रत्नागिरी), चि. गुळभिले अभिजीत (शा. अभियांत्रिकी, रत्नागिरी), चि. आंधळे संतोष (शा. अभियांत्रिकी, कराड) व चि. कराड अशोक ( शा. अभियांत्रिकी, कोल्हापूर) यांना प्रवेश मिळविण्यात यश आले आहे. प्राध्यापक सोनवणे सरांनी या विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी लागणारे सर्व तयारी खूप मेहनतीने करून घेतली. मागील दहा वर्षापासून क्लासेसचे विद्यार्थी दरवर्षी चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळून देण्यात एस.एस. ग्रुप ऑफ मॅथेमॅटिक्स मोठा सिंहाचा वाटा असतो. क्लासेस मधील इतर पंधरा विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रातील नामांकित AUTONOMOUS कॉलेज प्रवेश निश्चित झाला आहे. या यशामागे सोनवणे सरांच्या अतोनात प्रयत्न कामी येत असून क्लासेसचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मनोगत.. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असून देखील त्यांना दर्जेदार शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे आजही हे विद्यार्थी या स्पर्थे मध्ये माघे पडतना दिसत आहे. तसेच Mathematic या विषयाची मनात असलेल्या भीतीमुळे बरेच विद्यार्थी अभियांत्रिकी या क्षेत्राकडे येत नाही. ही गरज लक्षात घेवून 2014 साली अंबाजोगाई या ठिकाणी एस. एस.ग्रुप ऑफ मथेमटिक्स या कोचिंग क्लास ची स्थापणा केली. आज या कोचिंग क्लासने 10 वर्ष पूर्ण केले असून, शेकडो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शासकीय अभियांत्रिकी महािद्यालयात प्रवेश मिळवला आहे. या पुढील काळात दुर्गम ग्रामीण भागापर्यंत विध्यार्थ्यांना या शिक्षणाच्या प्रवाहात आण्यासाठी एस. एस ग्रूप ऑफ मथेमटिक्स चा प्रयत्न असेल *श्री.बाप्पासाहेब सोनवणे , संचालक, एस. एस.ग्रुप ऑफ मॅथेमॅटिक्स, अंबाजोगाई




