आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बीडमध्ये रंगणार जिल्हास्तरीय युवा महोत्सव सहभागासाठी 02 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

बीड, दिनांक 27 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व बीड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 04 ते 05 डिसेंबर या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, बीड येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 15 ते 29 वर्षे वयोगटातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी यामध्ये सहभागासाठी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज 02 डिसेंबरपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत बीड येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल इमारत येथे सादर करून महोत्सवात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, तालुका क्रीडा अधिकारी पंडित चव्हाण यांनी केले आहे. मुदतीनंतर येणारे व स्पर्धेच्या दिवशी वेळेवर येणारे प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. जिल्हास्तर युवा महोत्सवात संकल्पनांवर आधारित स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यात समूह लोकनृत्य, लोकगीत, कौशल्य विकास कार्यक्रम यात कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, कविता गायन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात समूह लोकनृत्य स्पर्धेसाठी विजेत्यास प्रथम सात, द्वितीय पाच तर तृतीय बक्षीस तीन हजार रुपये देण्यात येईल. लोकगीत स्पर्धेसाठी विजेत्यास प्रथम बक्षीस पाच, द्वितीय तीन तर तृतीय दोन हजार 500 रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत. कौशल्य विकास कार्यक्रमात कथालेखन 1000 शब्द मर्यादा लेखनासाठी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत स्पर्धा होईल. तसेच चित्रकला, हिंदी व इंग्रजी भाषेतील वक्तृत्व स्पर्धा व कविता (होणार आहे. विजेत्यास प्रथम बक्षीस 3 हजार, द्वितीय 2 हजार तर तृतीय 1 हजार 500 रुपये बक्षीस देण्यात येईल. त्याचप्रमाणे संकल्पनांवर आधारित स्पर्धा विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना योगदान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यास प्रथम बक्षीस पाच हजार, द्वितीय बक्षीस तीन हजार, तर तृतीय बक्षीस दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत. युवा महोत्सवात सहभागासाठी स्पर्धकांचे वय 15 ते 29 वर्षे असे राहील. जन्म तारखेबाबत सबळ पुरावा जोडणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी स्पर्धक हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, स्पर्धकांनी नाव, पत्ता, जन्मतारीख, संपर्क क्र. ईमेल आयडी, व याबाबत सबळ पुरावा सादर करणे आवश्यक आहे. त्याकरिता स्पर्धकांनी विहित नमुन्यात प्रवेश अर्ज व ओळखपत्र 02 डिसेंबर पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, सहयोग नगर, जालना रोड, बीड येथे करावेत. युथ आयकॉनसाठी दोन डिसेंबर रोजी दुपारी 3 पर्यंत मुदत युवक कल्याण क्षेत्रात तसेच युवांना प्रभावित करणारे कार्य केलेले 15 ते 29 वयोगटातील युवा यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथे 02 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत माहिती सादर करावी. (युवांनी नाव, पत्ता, इ-मेल आयडी, संपर्क क्रमांक व युवांनी केलेल्या कार्यांची संक्षिप्त माहिती अंदाजित 2000 शब्दात द्यावी. ) युथ आयकॉन मधील विजेत्यांना नियमाप्रमाणे देय बक्षीसे असतील. अधिक माहितीसाठी येथे साधा संपर्क युवा महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, कृषी महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाविद्यालये व इतर विद्यालयांनी सहभागासाठी नियम व विहित नमुन्यातील अर्ज आणि अटी व शर्तीच्या माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथे कार्यालयीन वेळेत किंवा प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा क्रीडा अधिकारी अनिकेत काळे – 96049 59678, कालिदास होसुरकर – 94215 95515, क्रीडा मार्गदर्शक सतिश राठोड – 99230 19353, अविनाश पाटील – 96237 81121, रेवननाथ शेलार – 90754 76791, जितेंद्र आराक 92264 81728, योगेश करांडे – 99229 99672 यांच्याशी संपर्क साधून जिल्हास्तर युवा महोत्सवाबाबत माहिती घेऊ शकतात.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!