आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीयसंपादकीय

“अंबा सहकारी साखर ( बंद )कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर यांचा शरद पवार गटात प्रवेश; भाजप सोडून पुन्हा राष्ट्रवादीकडे वळले”

भरारी न्युज .दि.25/10/2024 अंबा सहकारी साखर ( बंद)कारखान्याचे चेअरमन रमेशरावजी आडसकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून माजलगाव मतदारसंघात उमेदवारी दिली होती. आता पुन्हा एकदा त्यांना भाजपकडून माजलगावच्या विधानसभेचे तिकीट हवे होते, पण त्यांचे तिकीट मिळण्याची शक्यता कमी झाल्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यापूर्वी, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, परंतु माजलगाव मतदारसंघात तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा राष्ट्रवादी फुटल्यानंतर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला असून, स्वतः शरद पवार यांनी रमेशरावजी आडसकर यांच्या गळ्यामध्ये तुतारी चिन्हाची शाल टाकून पक्षात घेतले आहे. मात्र, अनेकांना शंका आहे की, अशा तिकीटासाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्याला तिकीट दिले जाईल का, निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळेल? माजलगाव मतदारसंघातील नागरिकांना विचार पडतोय की, रमेशराव आडसकर निवडणुकीनंतर खरंच शरद पवार गटात राहतील का, पदासाठी ते पुन्हा पक्षांतर करतील? पदासाठी पळणाऱ्या नेत्याची ओळख त्यांच्यावर पडते का, हा प्रश्न सामान्य जनतेसमोर उभा राहिला आहे. राष्ट्रवादीतील गटातटाचे राजकारण पाहून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, आता परत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे केज आणि माजलगाव मतदारसंघातील जनता त्यांच्याकडे नजर लावून आहे की ते आणखी कोणत्या गटात प्रवेश करतिल का राष्ट्रवादीतच राहतील.

Spread the love

“अंबा सहकारी साखर ( बंद )कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर यांचा शरद पवार गटात प्रवेश; भाजप सोडून पुन्हा राष्ट्रवादीकडे वळले”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!