आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्कॉर्पिओ सह सुमारे साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त…!

बीड दि.२८ - विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुशंगाने यूसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत कळंब- अंबाजोगाई रोडवर आंतरजिल्हा स्थिर सर्व्हेक्षण पथक नेमून महामार्गावरील वाहनांची तपासणी करण्यात येत असून सदर ठिकाणी महसूल व पोलीस विभागांचे संयुक्त पथक 24 तास कार्यरत आहे. आज दि. 28/10/2024 रोजी दुपारी 3.20 वा. चे सुमारास वाहन तपासणी करत असताना पथकास कृष्णा तुकाराम कोल्हे व बळीराम त्रिंबक कोल्हे दोघे रा. नायगाव, ता. केज, जि. बीड हे दोघेजण स्कॉर्पिओं वाहन क्र एम एच 44 झेड 1563 मधून अवैध दारू वाहतूक करत असताना मिळून आले. सदर वाहनात एकुण 35,520/- रूपयांची विदेशी दारूचे व बिअरचे एकुण 05 बॉक्स मिळून आलेले असून युसूफ वडगाव पोलीस ठाणे येथे मद्यनिषेध कायदयान्वये गुन्हा नोंदवण्यात आलेला असून सदर गुन्हयात स्कॉर्पिओ वाहनासह एकूण 10,35,520/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी स्थिर सर्वेक्षण पथकातील पोहवा 1483 सत्यपाल कांबळे, पोशि/916 अविनाश मोकाशे, पोशि 1914 पठाण, श्री एम. पी. बोधीकर, आर के. हारे, यु. ए. माळी यानी केली.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!