नित्यार्थ आरोग्यवर्धिनी कर्मचार्यांचे पगार वेळेवर करण्यात यावे-सैदप्पा झळकी यांची मागणी…..!

अक्कलकोट(प्रतिनिधी)दि९-सोलापूर जिल्ह्यातील नित्यार्थ आरोग्यवर्धिनी चे पगार वेळेवर करण्यात यावे अशी मागणी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी केली आहे.
काल झळकी यांनी जिल्हाधिकारी श्री कुमार आशिर्वाद आणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा ओव्हाळ यांना निवेदन देवून त्यात नमूद केली आहे की,संपूर्ण जिल्ह्यातील नित्यार्थ आरोग्य वर्धिनी कर्मचारी यांचा गेल्या पाच महिन्यापासून पगार नाही.संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य वर्धिनी कर्मचार्यांचे पगार झाले असून फक्त सोलापूर जिल्यातील कर्मचार्यांचे पगार झाले नाही.गेल्या मार्च महिन्या पासून काम करत आहे.जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नवीन कर्मचारी नियुक्ती करुन वैद्यकीय केंद्रे स्थापन करण्यात आली आहे.तरी आजतागायत नियुक्त केलेल्या कर्मचारी यांच्या पगार झाला नाही.
आपण वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात जातीने लक्ष घालून पगार होण्या कामी सहकार्य करावे.अन्यथा रिपाइं (आठवले गट) च्या वतीने आंदोलन छेडण्याच्या इशारा झळकी यांनी दिला आहे. या निवेदनाच्याप्रति, त्यांनी आरोग्यमंत्री महाराष्ट्र,
.रामदास आठवले.सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार आणी जिल्हाधिकारी सोलापूर यांना पाठवण्यात आले आहे.



