आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यंदाचा दीपस्तंभ पुरस्कार नगरविकास फाउंडेशनचे प्रमुख संतोष सोनवणे यांना जाहीर.

Spread the love

सोलापूर:- प्रसन्न पब्लिकेशन हाऊस तसेच प्रसन्न फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तिमत्वास हा पुरस्कार देण्यात येत आहे यंदाचं हे तिसरं वर्ष असून सामाजिक क्षेत्रामध्ये दोन दशकापेक्षा जास्त काळ कार्यरत असणारे नगरविकास फाउंडेशनचे प्रमुख संतोष सोनवणे यांना जाहीर करण्यात आलेला आहे. नगरविकास फाउंडेशन च्या माध्यमातून प्रत्येक शहर जिल्ह्यामध्ये आंबेडकर अनुयायी भवन असावे या संकल्पनेला प्रत्यक्षत आणण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शहर जिल्ह्यामध्ये स्वतःचा संपर्क ठेवून सतत कार्यमग्न असणारे त्याचबरोबर आंतरजातीय विवाह चा प्रचार प्रसार करणारे आंतरजातीय विवाह ही काळाची गरज असून त्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला आपल्या परीने सर्व तो सहकार्य व मदत करणारे त्याचबरोबर विवाह – प्रेमविवाह – आंतरजातीय विवाह हे टिकले पाहिजेत.वाचन संस्कृती टिकवण्याकरिता अनेकांना त्यांच्या मंगल प्रसंगी पुस्तक रुपी शुभेच्छा देणे. विविध सामाजिक विषयासाठी सतत प्रयत्नशील असणारे या सामाजिक कार्याकरिता दीपस्तंभ प्रेरणादायी व्यक्तिमत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे हा पुरस्कार रविवार दिनांक ११/८/२०२४ रोजी सकाळी मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री  विजयसिंह मोहिते-पाटील, तसेच  खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते व सौ.शितलदेवी मोहिते-पाटील अध्यक्षा. डॉटर अँड मॉम फाउंडेशन , डॉ. नितीन वाघमोडे आयकर आयुक्त , .अनिल माने उपसंचालक भूमी अभिलेखा पुणे विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील स्मृतीभवन,यशवंत नगर अकलूज या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजक तथा प्रसन्ना पब्लिकेशन हाऊस अध्यक्ष नवनाथ धांडोरे यांनी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे नगर विकास फाउंडेशनचे प्रमुख संतोष सोनवणे यांना जाहीर केले आहे.

 

 

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!