आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

वीरशैव जंगम समाजाच्या वतीने समाजसेवक महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे मागणी…..!

Spread the love

सोलापूर:- एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर चे काँग्रेस चे नेते महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून आज वीरशैव जंगम समाज सामाजिक संस्था, सोलापूर यांच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.यावेळी वीरशैव जंगम समाज सामाजिक संस्थेचे जिल्हा अध्यक्ष मल्लिकार्जुन हिरेमठ,जिल्हा उपाध्यक्ष ॲड.इरेश स्वामी,महिला अध्यक्ष निता स्वामी, कार्याध्यक्ष धानम्मा ताई मधली,दक्षिण सोलापूर तालुका युवा अध्यक्ष ओमकार स्वामी, बसवराज सारंगमठ,किरण स्वामी, सागर स्वामी, राचय्या मठपती,सचिन मठ, बसवराज मठपती यांच्यासह जंगम समाजाचे असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

वीरशैव लिंगायत समाजातील समाजसेवक महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूर मधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी.दक्षिण सोलापूर मध्ये लिंगायत समाज हा मोठ्याप्रमाणात आहे. त्याचा फायदा त्यांना नक्की होणार आहे. तसेच महादेव कोगनुरे हे कित्येक वर्षापासून सामाजिक कार्य करतात त्यांनी राजकारणात यावे अशी दक्षिण सोलापूर येथील जनतेची खूप ईच्छा आहे.म्हणून आम्ही देखील दक्षिण सोलापूर तालुका वीरशैव जंगम समाज बांधवांच्या वतीने समाजसेवक महादेव कोगनुरे यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे वीरशैव जंगम समाजाचे संस्थापक अध्यक्ष मल्लिकार्जुन हिरेमठ यांनी निवेदनात नमूद करण्यात आले आहे

.यावेळी महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून वीरशैव जंगम समाज बांधवांच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले.तसेच महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूरची उमेदवारी दिल्यास ते मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचे ही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!