आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जय भारत प्राथमिक शाळेमध्ये 15 मे स्व.करण (अण्णा )म्हेत्रे यांची पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न……!

Spread the love

सोलापूर:- जय भारत प्राथमिक शाळेमध्ये 15 मे सामाजिक कार्यकर्ते स्व.करण अण्णा म्हेत्रे यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य श्री .मारुती माळगे, मुख्याध्यापक नारायण सूर्यवंशी सर ,श्री यल्लाप्पा बुगले ,मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ सदस्य श्री बुगप्पा म्हेत्रे आणि भरारी मित्रपरिवार उपस्थित होते .अध्यक्षीय भाषणात बोलतांना मारुती माळगे म्हणाले की,मोची समाजातील आदर्श नेत्तृत्व होते .युवा पिढीसमोर एक आदर्श म्हणून त्यांनी कार्य केले .कमी कालावधीमध्ये कामाच्या जोराने ते सर्वांचे लोकप्रिय झाले. त्यामध्ये राहू नये म्हणून शिंदी, दारूबंदी आंदोलन करून मोची समाज व्यसनापासून लांब राहण्यासाठी प्रयत्न केले. युवकांनी व्यसनाधीनतेमध्ये न राहता आपले शरीर सुदृढ करण्यासाठी त्यांनी जांबमुनी चौकामध्ये व्यायाम शाळेची स्थापना केली.

एक निस्वार्थी निःस्पृह व्यक्तिमत्व म्हणजे करण अण्णा म्हेत्रे.१५ मे २०२१मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्ययात्रेला झालेली गर्दी बघूनच त्यांची लोकप्रियता लक्षात येते.जनमानसाचा मनात एक वेगळी ओळख प्रस्थापित केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!