खासदार चंद्रकांतजी हंडोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा…..!

सोलापूर:- खासदार चंद्रकांतजी हंडोरे यांचा वाढदिवस .उमेश सुरते यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रमाने मिठाई वाटून साजरा करण्यात आला.
.खासदार चंद्रकांतजी हंडोरे यांचा वाढदिवस भीमशक्ती सामाजिक संघटना शहर जिल्ह्याचा वतीने माता रमाई आंबेडकर उद्यान येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जेष्ठ आंबेडकर चळवळीचे नेते सुभानजी (काका )बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमांस सुरवात करण्यात आली.
या वेळी भीमशक्ती महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश बंगाळे, जिल्हा अध्यक्ष संजय रणदिवे, महिला जिल्हा अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, शहर अध्यक्ष शोभाताई काळे, प्रकाश बनसोडे, मयूर तळभंडारे व युवा काँग्रेस नेते माया (भाय )कांबळे व तमाम भीमशक्ती शहर जिल्हा चे पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी केल्या बद्दल शहर अध्यक्ष उमेश सुरते यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे विशेष आभार मानले.



