व्ही. जी. शिवदारे ज्युनिअर कॉलेज मध्ये “प्रयोगातून विज्ञान” हा कार्यक्रम संपन्न…..!

सोलापूर:- दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित व्ही. जी. शिवदारे ज्युनियर कॉलेज, युनिक इंग्लिश मिडियम स्कुल व मराठी विज्ञान परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ व १३ फेब्रुवारी २०२४ या कालावधी मध्ये “प्रयोगातून विज्ञान” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांची वैज्ञानिक दृष्टी वाढावी. त्यांची जिज्ञासा, कुतूहल वाढावे. हा दृष्टीकोन ठेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उदघाटन डी.एस.टी.एस. मंडळाचे विश्वस्त श्री. बी. व्ही. शेटे यांचे हस्ते करण्यात आले. मराठी विज्ञान परिषद जळगाव चे सचिव प्रा. दिलीप भारंबे यांच्या “प्रयोगातून विज्ञान” या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती वाढावी यासाठी विविध प्रयोग झाले.
टाकाऊ वस्तुंमधून विज्ञान कसे शोधावे, निरीक्षण शक्ती कशी असावी याची माहिती मिळाली. Static Electricity, Surface tension, गतीविषयक न्युटनचे नियम, प्रकाशाचे पूर्णपरावर्तन, ऊर्जा , संवेग आणि विद्युत प्रभार यांचे अक्षय बाबतचे नियम इ. संकल्पना स्पष्ट केल्या. . क्रांतीवीर महिंद्रकर यांनी चमत्कारातील विज्ञान विद्यार्थ्यांना समजावून सांगितले या कार्यक्रमासाठी विधिध शाळा, महाविद्यालयातील सुमारे ५०० विद्यार्थी सहभागी झाले होते.

सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री राजशेखर शिवदारे , मराठी विज्ञान परिषद शाखा सोलपुरचे अध्यक्ष डॉ . व्यंकटेश गंभीर , शैक्षणिक सल्लागार सौ. अंजली तिवारी, प्राचार्य डॉ. डी.एस. सुत्रावे, प्र. प्राचार्या एस.एस. गायकवाड व प्राचार्या पूजा बाजपेई, डॉ निनाद शहा यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. श्रध्दा कांबळे, सुत्रसंचालन कु. अंजली पाटील तर आभार प्रदर्शन सुकन्या कुंभार यांनी केले .



