मिनिमम पेन्शन वाढीबाबत युद्ध पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू…..! बैठकावर बैठका सुरू, लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या आधी निर्णय होण्याची शक्यता….!

भवानीनगर : मिनिमम पेन्शन वाढीबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली असून याबाबत लोकसभा निवडणुकीच्या आत निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे . निर्णय घेण्यासाठी बैठकावर बैठका सुरू असून दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी मथुरेच्या खासदार सौ हेमा मालिनी यांच्या मध्यस्थीने व केंद्रीय श्रम मंत्री श्री भूपेंद्र यादव यांच्या निर्देशनानुसार श्रम मंत्रालय कर्मचारी भविष्य निधी संघटनचे उच्चस्तरीय अधिकारी व राष्ट्रीय संघर्ष समितीचे प्रतिनिधी मंडळ यांच्यामध्ये श्रम मंत्रालय नवी दिल्ली येथे त्रिपक्षीय बैठक सफलता पूर्वक संपन्न झाली. या बैठकीमध्ये मथुरेच्या खासदार श्रीमती हेमा मालिनी या देखील बैठकीला उपस्थित होत्या. सदरच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये संयुक्त श्रम सचिव सौ विभा भल्ला, अतिरिक्त केंद्रीय भविष्य निधी आयुक्त श्री अनिमेश मिश्रा, छेत्रीय भविष्य निधी आयुक्त सौ अपराजिता जग्गी, ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे प्रतिनिधी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष चीफ कमांडर अशोक राऊत, राष्ट्रीय महासचिव श्री वीरेंद्रसिंह राजावत, राष्ट्रीय सचिव श्री राजीव भटनागर इत्यादी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला श्रम सचिव सौ विभा भल्ला यांनी मथुरेच्या खासदार खासदार सौ हेमामालिनी यांचे स्वागत केले व राष्ट्रीय संघर्ष समितीच्या प्रतिनिधींना पेन्शन वाढीबाबत ची माहिती देताना सांगितले की राष्ट्रीय संघर्ष समितीच्या प्रतिनिधी मंडळाबरोबर 14 डिसेंबर 2023 रोजी जी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीनंतर विविध स्तरावर चार बैठका झाल्या असून श्रम मंत्रालय व ईपीएफओच्या वतीने मिनिमम पेन्शन वाढीच्या हेतूने युद्ध पातळीवर पुढील प्रक्रिया चालू केली आहे.
या बैठकीमध्ये संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी आपल्या पेन्शन वाढीबाबतच्या सर्व मागण्यांचा आढावा घेतला या सर्व मागण्या बैठकीमध्ये ऐकून घेण्यात आल्या. राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने मिनिमम पेन्शन 7500 रुपये अधिक महागाई भत्ता तसेच सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मोफत आकर्षक मेडिकल सुविधा तसेच पेन्शनच्या बाहेर असणारा कर्मचाऱ्यांना रुपये 5000 पर्यंत पेन्शन मिळाली पाहिजे इत्यादी मागण्यांवर विशेषतः यावर जोर दिला. सर्व चर्चेनंतर श्रम सचिव सौ विभा भल्ला यांनी सांगितले की ईपीएस 95 पेन्शनरच्या हितासाठी जे काही चांगले करता येईल यावर अभ्यास सुरू आहे. व याला अंतिम स्वरूप देण्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समितीच्या प्रतिनिधी मंडळाला काही चांगले प्रस्ताव घेऊन पुढील आठवड्यात चर्चेसाठी बोलवले आहे. अन्य मुद्द्यांवरही आपण आम्हाला आपण काही सूचना करू शकता. परंतु आपण आपले चालू असलेले उपोषण बंद करा. यानंतर श्रम सचिव सौ अपराजिता जग्गी यांनी पुढील आठवड्यात राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यासह प्रतिनिधी मंडळाच्या बरोबर पेन्शन वाढी बाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच जर आवश्यकता पडली तर राष्ट्रीय संघर्ष समितीच्या मागण्यांवर विशेष सीबीटी मीटिंग देखील आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या बैठकीचा सर्व वृत्तांत खासदार श्रीमती हेमामालिनी यांनी विचारपूर्वक ऐकून घेतला व शेवटी आचारसंहितेच्या आत ईपीएस 95 सेवानिवृत्त पेन्शन धारकांचा समस्यांवर समाधानकारक निकाल देण्याची श्रम सचिवांना विनंती केली.
बैठकीच्या शेवटी राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष चीफ कमांडर अशोक राऊत यांनी मथुरेच्या खासदार सौ हेमा मालिनी, श्रम मंत्री श्री भूपेंदर यादव तसेच श्रम मंत्रालयातील सर्व उच्च पदस्थ अधिकारी व राष्ट्रीय संघर्ष समितीच्या लढ्याला साथ देणाऱ्या सर्व सेवानिवृत्त पेन्शन धारकांचे मनःपूर्वक आभार मानले.
आता सर्व सेवानिवृत्तांना आशा आहे की केव्हा एकदा लवकरात लवकर पेन्शन वाढीचा निर्णय होऊन केव्हा एकदा पेन्शन मध्ये त्वरित वाढ होती .

*प्रकाश ज्ञानदेव शिंदे*
अध्यक्ष , ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती, इंदापूर तालुका
मु.पो.सणसर,ता.इंदापूर,जि.पुणे
मो.नं.9657220101



