ताज्या घडामोडी

कल्याणशेट्टी महाविद्यालयातील कु तेजश्री विभुते व प्रा राजशेखर पवार यांची राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी निवड…..!

Spread the love

अक्कलकोट -विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्वयंसेविका कुमारी तेजश्री विभुतेची राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी निवड झाली आहे तर प्रा. राजशेखर पवार यांच्यावर संघ व्यवस्थापकाची जबाबदारी देण्यात आली आहे

राष्ट्रीय सेवायोजना विभागाचे हे राष्ट्रीय एकात्मता शिबीर दिनांक 6 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी च्या दरम्यान गुलबर्गा विदयापीठात, कलबुर्गी येथे होणार आहे या शिबिरासाठी विद्यापीठातून दहा विदयार्थी प्रतिनिधीची निवड करण्यात आली आहे या शिवाय कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, तेलंगना, मध्यप्रदेश, महाराष्ट्र येथील स्वयंसेवक देखील सहभागी होणार आहेत
या यशाबद्दल संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी विद्यापीठ रासेयो संचालक प्रा डॉ राजेंद्र वडजे, ज़िल्हा समन्वयक प्रा डॉ दंडे सर विभागीय समन्व्यक प्रा डॉ जवाहर मोरे सचालीका शाम्भवी कल्याणशेट्टी, मल्लिकार्जुन मसूती प्राचार्य डॉ राजेंद्रसिह लोखंडे प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी सी ई ओ रुपाली शहा पूनम कोक्कळगी यांनी अभिनंदन केले

विदयापीठाकडून संघास शुभेछ्या…..!

राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी संघास विदयापीठाकडून शुभेछ्या देण्यात आल्या यावेळी मा.कुलगुरु प्रा.डाॅ.प्रकाश महानवर, कुलसचिव योगिनी घारे,व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.देवानंद चिलवंत,श्री.राजाभाऊ सरवदे ,रासेयो संचालक डॉ.राजेंद्र वडजे संघ नायक प्रा राजशेखर पवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!