सोलापूर:- सावित्रीबाई फुले विद्यामंदिर कुमठा नाका येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव उत्तम सरवदे सर उपस्थित होते प्रशालेच्या मुख्याध्यापिका सरवदे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी या भागातील सर्व प्रतिष्ठित महिला तसेच विद्यार्थी बहुसंख्यने उपस्थित होते. पालकांनी व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले शेवटी विविध गुणदर्शनाने व खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.