*संस्कृत शिवाय पंचांग शक्य नाही – मोहन दाते यांचे प्रतिपादन*

सोलापूर:-( रत्नाकर लोंढे)संस्कृत भारती जिल्हा सोलापूर आयोजित संस्कृत संमेलन संगमेश्वर महाविद्यालय येथे दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संमेलनाचे उद्घाटन मोहन दाते यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी त्यांनी संस्कृत शिवाय पंचांग पाहणे शक्य नाही तसेच पंचांग पाहूनच चांद्रयानाचे उड्डाण झाले अशा विविध उदाहरणातून संस्कृतचे महत्त्व विशद केले.
प्रास्ताविक उन्मेष आटपाटीकर यांनी केले.याप्रसंगी संस्कृत भारती जिल्हाध्यक्षा डॉ. सौ. रजनी जोशी, संगमेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रसाद कुंटे ,संस्कृत भारती गजानन अंभोरे , जिल्हा संयोजक निखिल बडवे, पुणे विभाग प्रमुख उन्मेष आटपाडीकर उपस्थित होते. परिसंवाद या सत्रांमधून प्राची कुंटे, श्रुती देवळे व हिमांशू आयाचित यांनी संस्कृत तंत्र मंत्र व विज्ञान याविषयी आधुनिक काळातील संस्कृतचे महत्त्व सांगितले. संस्कृत भारतीच्या विविध कार्याविषयीचे एक सत्र संपन्न झाले .सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सत्रांमध्ये विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी संस्कृत मधून गीत नाटक स्तोत्र नृत्य इत्यादी कार्यक्रम सादर केले.या सत्राचे निवेदन दुर्गा जोशी यांनी केले. बार्शीतील सुरभी क्लासेस संचालिका वंदना कुलकर्णी यांच्या विद्यार्थ्यांनी वस्तू प्रदर्शनी सादर केली. समारोपाच्या सत्रात डॉ. गजानन अंभोरे यांनी संस्कृत जनभाषा व्हावी असे आवाहन केले.
यावेळी सायन्स इन संस्कृत, कौटिलीय अर्थशास्त्र या प्रदर्शनी मांडण्यात आल्या. संमेलन यशस्वी करण्यासाठी विजयकुमार काळेगोरे,अश्विनी कुलकर्णी, तृप्ती कुलकर्णी, पृथ्वीराज कोरे यांचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्जन्या अंजुटगी तर आभार प्रा. प्रदीप आर्य यांनी मांडले.



