आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*अखेर ईपीएस 95 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन वाढीच्या लढ्याला यश येण्याची चिन्हे…..! केंद्रीय मजूर मंत्र्याच्या आश्वासनानंतर दिल्लीतील पेन्शन वाढीचे उपोषण तूर्तास मागे…….!

31 डिसेंबर 2023 पर्यंत पेंन्शन धारकांना न्याय देण्याचे आवाहन .....अन्यथा पुढील आंदोलनाची दिशा ठरणार.....! कमांडर अशोक राऊत*

Spread the love

भवानीनगर : दिनांक 14 डिसेंबर पासून नवि दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावरील चालू असलेले आमरण उपोषण केंद्रीय मजूर मंत्री भूपेंदर यादव यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. नवि दिल्ली येथे राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने 7 डिसेंबर 2023 रोजी रामलीला मैदानावर पेन्शन वाढीसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भव्य दिव्य असा महामेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यास अंदाजे एक लाखाहून जास्त सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. या भव्यदिव्य महामेळाव्याची दखल अखेर केंद्रीय नेतृत्वाला घ्यावीच लागली. परंतु यावर निर्णय न झाल्याने दिनांक 8 डिसेंबर पासून जंतर मंतर मैदानावर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते.

या आमरण उपोषणाच्या कालावधीमध्ये बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, नंदुरबार च्या खासदार डॉ. हिना गावित, खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी उपोषणकर्त्यांना भेट देऊन पेन्शन वाढीचा प्रश्न संसदेत मांडण्याचे आश्वासन दिले होते. त्याचबरोबर खासदार हेमामालिनी यांनीही याबाबतीत प्रकर्षाने पुढाकार घेऊन राष्ट्रीय संघर्ष समितीचे पेन्शन वाढीचे निवेदन पंतप्रधानांपर्यंत पोहोच केले त्याचबरोबर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचीही भेट घडवून आणली.

कमांडर अशोकराव राऊत यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाबरोबर कामगार मंत्री भूपेंदर यादव यांच्याशी समक्ष चर्चा झाली आणि त्यांनी हा प्रश्न लवकर सोडवतो तसेच गेली 1820 दिवसांपासून बुलढाणा मुख्यालयामध्ये चालू असलेल्या उपोषण स्थळाला दिनांक 17 डिसेंबर रोजी भेट देण्याचे आश्वासन दिले आहे. राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने त्यांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत ची मुदत देऊन सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आमरण उपोषण व सर्व घडामोडीमध्ये राष्ट्रीय महासचिव वीरेंद्र सिंग राजावत, सौ.मीनाताई राजावत, डॉ.विलास पाटील, सुभाष पोखरकर, भगवंत वाळके, संपतराव समिंदर, दादाराव देशमुख, तसेच उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा या राज्यातून प्रत्येकी दोन असे प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
देशामध्ये ७२ लाखापेक्षा जास्त व महाराष्ट्रामध्ये 12 लाखापेक्षा जास्त सेवानिवृत्त पेन्शनधारक आहेत. गेल्या दहा वर्षा पासून पेन्शन वाढीसाठी अनेक प्रकारची आंदोलने झालेली आहेत. कमीत कमी रुपये 7500 पेन्शन वाढ, अधिक महागाई भत्ता व मोफत मेडिकल सुविधा ही सेवानिवृत्त पेन्शन धारकांची प्रमुख मागणी असून मोदी साहेबांनी *आपका काम हो जायेगा….* असे म्हणून राष्ट्रीय संघर्ष समितीच्या प्रतिनिधी मंडळाशी पेन्शन वाढीबाबत चर्चा करून त्यांना दिनांक 04 मार्च 2020 व 05 ऑगस्ट 2021 रोजी दोनदा पेन्शन वाढीबाबत आश्वासन दिले आहे. याला 10 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला असून अजूनही पेंन्शन वाढीबाबत निर्णय झालेला नसल्याने सेवानिवृत्त पेन्शन धारक निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.
आता सर्व पेन्शन धारकांचे 31 डिसेंबर 2023 च्या आत पेन्शन वाढीबाबतच काय निर्णय होईल याकडे लक्ष लागून राहिले आहे.

*प्रकाश ज्ञानदेव शिंदे*
अध्यक्ष
ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती इंदापूर तालुका,
मु.पो.सणसर,ता.इंदापूर,जि.पुणे
मो.नं.9657220101

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!