आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोलापूर जिल्हा न्यायालयीन पतसंस्थेच्या चेअरमनपदी सौ.पल्लवी पैठणकर तर व्हॉईस चेअरमनपदी सुधीर क्षीरसागर यांची बिनविरोध निवड……..!

Spread the love

सोलापूर:- सोलापूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीमध्ये एकूण 11 जागेपैकी सेवाभावी पॅनेलने सर्वाधिक म्हणजे 8 जागा जिंकून यापूर्वीच बाजी मारली आहे.सेवाभावी पॅनलच्या मार्गदर्शिका तसेच जिल्हा न्यायालयीन विद्यमान प्रबंधक सौ.पल्लवी पैठणकर यांची चेअरमनपदी तर व्हॉईस चेअरमनपदी सुधीर क्षीरसागर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सौ.पल्लवी पैठणकर यांनी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक म्हणून गेल्या 25 वर्षापासून अविरत काम केले आहे.त्यांच्या संकल्पनेने पतसंस्थचे सभासद व कर्मचारी यांच्या हिताकरिता बऱ्याच योजना अमलात आणून त्याचा प्रत्यक्ष लाभ सभासद आणि कर्मचाऱ्यांना मिळऊन दिला आहे.त्यांच्या अनुभवाचा लाभ निश्चितपणे नूतन संचालकांना होणार आहे.त्याचप्रमाणे व्हॉईस चेअरमनपदी निवड झालेले सुधीर क्षीरसागर यांनी गेल्या 10 वर्षापासून संचालक पदाची धुरा सांभाळत असताना त्यांनी यापूर्वीही पतसंस्थचे चेअरमनपद सांभाळले आहे.त्याच्याही अनुभवाचा फायदा संचालकांना कामकाज करताना होणार आहे.यांच्या निवडीने सभासद आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.तसेच सर्व संघटनाच्या अध्यक्षांनी त्यांनां भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सत्काराला उत्तर देताना .सौ.पल्लवी पैठणकर यांनी कर्मचाऱ्याभिमुख योजना अमलात आणण्याचा संकल्प जाहीर केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!