सोलापूर:- नोव्हेंबर २०२३रोजी,कोल्हापुर येथे ६ व्या राष्ट्रीय स्किल-डो मार्शल आर्ट स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत द ड्रॅगन तायक्वान्दो अकॅडमी, वसंत विहार येथील चि.शार्दुल जगदीश जगदाळे याने रौप्य पदक मिळविले. शार्दूल जगदाळे यास या स्पर्धेसाठी बौधराज ढेपे,संभाजी मस्के, डॉ. सृष्टी ठोंबरे यांचे मार्गदर्शन लाभले. शार्दूलच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.