आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर*

Spread the love

सोलापूर:– सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्य साधून येथील दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत आयोजित चित्रकला स्पर्धेत 500 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

प्रशालेच्या प्रांगणात आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक जितेंद्र पवार यांचे हस्ते करण्यात आले. तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक मोहन पाटील उपस्थित होते. यावेळी सौ. सायरा मोगल, सौ. सोनाली बिराजदार, महामंडळाचे कार्यवाह मल्लेश पुरवंत उपस्थित होते.
चित्रकला स्पर्धेचा निकाल- गट 1. प्रथम- अमृता जाधव, द्वितीय- चंदन कमलापुरे, तृतीय- अथर्व बडगू,उत्तेजनार्थ- भावना वडेपल्ली, शुभम कुंभार – गट क्रमांक दोन- प्रथम- स्नेहा येमूल,द्वितीय -ऋतुजा खेड,तृतीय – साक्षी मोदी आणि उत्तेजनार्थ – प्रतिक्षा माने, अक्षरा बसूदे
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ.सायरा मोगल व सौ.सोनाली बिराजदार यांनी काम पाहिले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ महामंडळाच्या अध्यक्षा लताताई फुटाणे,जितेंद्र पवार, मोहन पाटील यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सलीम पाटील, आप्पा चव्हाण, मल्लू बिराजदार यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लेश पुरवंत यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!