कल्याणशेट्टी शिक्षण संकुलनात श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी …..!

अक्कलकोट:-( प्रतिनिधी राजशेखर पवार )दिनांक 6 सविस्तर महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या सौ. सुरेखा कल्याणशेट्टी माध्य. व उच्च माध्यमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालयात श्री कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्रीकृष्ण व दहीहंडीचे पूजन जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा व गोपिका यांची सुंदर वेशभूषा केली होती तसेच फुलांची उधळण करीत गोविंदा आला रे .. आला या गीताच्या ठेक्यावर दहिहंडी फोडण्यात आली. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला.
यावेळी संस्थेच्या संचालिका सौ शांभवी कल्याणशेट्टी, सीईओ सौ. रुपाली शहा, ज्युनियर विभाग प्रमुख सौ पूनम कोकळगी, प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी, पर्यवेक्षक मोतीलाल चव्हाण, सांस्कृतिक विभाग प्रमुख खंडेराव घाटगे,सहाय्यक कल्पना स्वामी, पूजा कडबगावकर सर्व शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.



