आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*आगामी सण उत्सव, कायदा व सुव्यवस्थाच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची मिटिंग संपन्न*

Spread the love

अक्कलकोट:-( प्रतिनिधी राजेश पवार) — अक्कलकोट उपविभागातील सर्व *पोलीस पाटील* यांची कायदा सुव्यवस्था व आगामी आगामी सण, उत्सवाच्या अनुषंगाने उपविभागातील सर्व *पोलीस पाटील यांची आज दिनांक 28/08/2023 रोजी वार सोमवार सकाळी 11:00 वाजता ‘प्रियदर्शनी मंगल कार्यालय, कमलाराजे* चौक, अक्कलकोट*येथे मिटिंग घेण्यात आली..

मिटींगमध्ये विलास यामावार उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट यांनी उपस्थित सर्व पोलीस पाटील यांना मार्गदर्शन केले, मार्गदर्शन मध्ये गावात छोट्या -मोठ्या गोष्टी, घडत असतात त्या पोलीस पाटील यांचेकडून तात्काळ पोलीस ठाणे स कळविणे पोलीस पाटील यांचे कर्तव्य आहेत. तसेच कोणत्याही गावात विनापरवाना वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे झेंडे लावत असतील त्यामुळे कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते अशावेळी सदरची माहिती पोलीस ठाणेस कळविण्यात यावे.’ *आपले गाव आपली सुरक्षा’* यासाठी गावात 20 ते 25 लोकांचा ‘ *ग्रामसुरक्षा दल’* स्थापन करण्यात यावे. ज्या गावात स्थापन आहेत ते सक्रिय करा आणि जेथे नव्याने *ग्राम सुरक्षा* स्थापन केलेत त्यांना लाठी, शिट्टी व टॉर्च हे पोलीस प्रशासन यांचे कडून देण्यात येईल.आगामी सण ,उत्सव निमित्त सर्व पोलीस पाटील यांनी गावात सतर्क राहून आपले कर्तव्य करावे. असेही यावेळी सूचना यावेळी विलास यामावार यांनी सांगितले.
यावेळी पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी हद्दीतील पोलीस पाटील यांना कामात हलगर्जीपणा अथवा गावात घडलेल्या छोट्या -मोठ्या गोष्टी पोलीस ठाणेस कळविण्यास विलंब केल्यास त्या पोलीस पाटील यांचा कसुरी अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल असे सांगितले..
यावेळी पोलीस पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून मौजे -रामपूर चे पोलीस पाटील शिवानंद फुलारी यांनी गाव पातळीवर पोलीस पाटील यांना काम करताना अडचणी येतात पण यापुढे सर्व पोलीस पाटील प्रामाणिकपणे काम करतील अशी पोलीस पाटील यांच्या वतीने ग्वाही दिली..
यावेळी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, वळसंग पोलीस ठाणेचे अनिल सनगले,सपोनि/महेश
भावीकट्टी,पोसई/चंद्रकांत पुजारी,
पो.हे.कॉ./धनराज शिंदे, गोपनीय अंमलदार, अशोक पाटील,गोपीनिय अंमलदार गजानन शिंदे, पोलीस अंमलदार नबीलाल मियावाले, हजेरी मेजर केदार सुतार व 95 गावचे *पोलीस पाटील* हजर होते…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!