*ह. दे .प्रशालेमध्ये सायबर सुरक्षितता याबाबत कार्यशाळा संपन्न*……!

सोलापूर:-(उपसंपादक रत्नाकर लोंढे) पोलीस आयुक्तालय, सायबर गुन्हे शाखा सोलापूर व ह.दे .प्रशाला सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली.

सायबर सुरक्षिततेबाबत इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा शुक्रवार दिनांक 25/ 8/ 2023 रोजी मुळे सभागृहात आयोजित केली होती.
दैनंदिन व्यवहारातील ऑनलाइनची कामे करताना आणि मोबाईल वापरताना होणारी फसवणूक टाळून त्याबाबत सतर्क राहण्याबद्दलची माहिती पोलीस आयुक्तालय सोलापूर सायबर गुन्हे शाखा येथील प्रांजली काळे ( हेड कॉ.)अश्विनी लोणी (पो. कॉ.) व यांनी विद्यार्थ्यांना सविस्तरपणे सांगितली व त्याच विषयावर विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे सर यांनी आपल्या मनोगतातून तंत्रज्ञानाचा जागरूकतेने वापर करावा असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोतीबने सर यांनी व आभार प्रदर्शन सर्वगोड सर यांनी केले. या कार्यशाळेसाठी सर्व पर्यवेक्षक,शिक्षक ,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



