आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*श्री समर्थ मठ खातगावच्या तपपूर्ती व पुरुषोत्तम मास निमित्त श्रीराम कथा उत्साहात सुरू*

Spread the love
  • अहमदनगर ( विशेष प्रतिनिधी सखाराम कुलकर्णी) प.पू.समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांच्या प्रेरणेने स्थापित झालेल्या आनंदी नारायण कृपा न्यास संचालित समर्थाचे अधिष्ठान असलेल्या श्री समर्थ मठ खातगाव ता.कर्जत च्या तपपूर्ती सोहळ्या निमित्त व पुरुषोत्तम मास निमित दि. ८ ते १६ ऑगस्ट श्री रामकथा संपन्न होत असून आज अन्नपूर्णा गृह आणि सेवक निवास या वास्तूचा लोकार्पण सोहळा कथा निरूपणकार. स.भ. मंदारबुवा रामदासी, स.भ.मोहनबूवा रामदासी,बंडोपंत कुंटूरकर यांच्या हस्ते संपन्न झाला .

आनंदी नारायण कृपा न्यास संचालित श्री समर्थ मठ खातगाव या पावित्र स्थानाच्या स्थापनेस १२ वर्ष पूर्ण झाली .या मठाचा तपपूर्ती सोहळा पवित्र अधिक मासाच्या पर्वावर संपन्न होत आहे. श्री समर्थ मठ आणि मठाद्वारे संचलित सर्वही सेवा उपक्रम असंख्य समर्थ भक्त ,ग्रामस्थ, विश्वस्त यांच्या समर्पणातून उभे राहिले. आणि समर्थ कृपेने या सर्व सेवा कार्याचा विस्तार झाला व अजूनही होत आहे. या तपपूर्तीच्या निमित्याने सर्व भक्तांचे एकत्रीकरण व्हावे ,समर्थ चरणी कृतज्ञता व्यक्त करून पुढील सेवा कार्यासाठी साधना घडावी अशी सर्वांची इच्छा लक्षात घेऊन दिव्य अशा तपपूर्ती सोहळ्याचे आयोजन समर्थ भक्त मोहनबूवा रामदासी यांच्या प्रेरणेने व संकल्पनेने विश्वस्थानी या सोहळ्याचे आयोजन केले आहे. या उत्सवा अंतर्गत श्री राम कथेचे आयोजन केले असून श्री राम कथा निरूपणकार स.भ. मंदारबुवा रामदासी यांच्या सुमधुर वाणीतून संपन्न होत आहे. आज कथेचा सहावा दिवस संपन्न झाला. तसेच आज परमपूज्य श्रीधर स्वामी अन्नपूर्णा गृह आणि सेवक निवास या वास्तूचा लोकार्पण सोहळा कथा निरूपणकार श्री.स.भ.मंदारबूवा रामदासी,स.भ.मोहनबुवा रामदासी,बंडोपंत कुंटूरकर यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. ही वास्तू कै. प्रदीपराव श्रीनिवासराव औरादकर यांचे स्मरणार्थ श्री संजय प्रदीपराव औरादकर नांदेड यांचेकडून श्री समर्थ चरणी अर्पण झाली आहे. तसेच मठाच्या तपपूर्ती स्मरणिकेचे प्रकाशन दि. १५ ऑगस्ट ला होणार आहे.या स्मरणिकेत मठाचे १२ वर्षात केलेल्या कार्याचा आढावा घेतला आहे. निसर्गरम्य व शांत वातावरणात असलेल्या या मठात भक्तांसाठी निवास व्यवस्था, भोजन, नाष्टा, निःशुल्क देण्यात येत आहे. सर्व भक्तांनी कथेचा स्वाद घ्यावा व एक वेळ मठात येऊन समर्थांचा आशिर्वाद घ्यावा असी विनंती विश्वस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!