राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या जिल्ह्याच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन…..!

सोलापूर : – केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे कामगार हिता विरोधी आणि जनहित विरोधात घेत असलेल्या घोरणाच्या निषेधार्थ म्हणुन ” राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ” सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने आज दि.09/08/23 रोजी सोलापूर जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार ( मॅडम ) यांना त्यांच्या दालनामध्ये समक्ष भेटुन ” महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री .एकनाथ शिंदे यांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाकडे विशेष लक्ष वेधुन त्यांच्या प्रलंबित असलेल्या अनेक मागण्याची लवकरात लवकर पूर्तता करण्यात याव्यात.अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सोलापूर जिल्हा सहसचिव राजाभाऊ सोनकांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सटवाजी होटकर, सहसचिव अशोक नागरगोजे, जिल्हा संघटक बाळकृष्ण पुतळे, राजेंद्र शिंदे (कृषि विभाग ), ज्येष्ठ नेते आशुतोष नाटकर (सार्वजनिक बांधकाम विभाग ), औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गट निदेशक अध्यक्ष मोटे सर, मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष भीमराव लोखंडे, जिल्हा संघटक रमाकांत साळुंखे, ( जिल्हा परिषद ) चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते रघुनाथ बनसोडे, जिल्हा संपर्क सचिव शशिकांत भालेराव, जिल्हा कोषाध्यक्ष हुसेनबाशा मुजावर यांच्यासह महाराष्ट्र राज्य कुष्ठरोग संघटनेचे प्रदेश अध्यक्ष ढगे आदी जबाबदार पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.




