आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ह.दे प्रशालेत बाल लैंगिक अत्याचार कायदा 2012 बाबत कायदेविषयक शिबिर संपन्न….!

Spread the love

सोलापूर :- (उपसंपादक रत्नाकर लोंढे याजकडून) जिल्हा विधी प्राधिकरण व हरिभाई देवकरण प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमानाने मा.अध्यक्ष जिल्हा विधी प्राधिकरण सोलापूर व मा. शाळा समिती श्री राजेश पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा 2012 बाबत कायदेविषयक शिबिर संपन्न झाले. मा. श्री नरेंद्र जोशी ( सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ) होते. प्रमुख  पाहुण्यांचा परिचय व प्रस्तावना एडवोकेट रेवण पाटील ( असिस्टंट डिफेन्स कौन्सिल सोलापूर )यांनी केली. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला.

प्रमुख पाहुण्यांनी  आपल्या मनोगतामध्ये बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा 2012 या कायद्याच्या तरतुदी आणि हेतूबाबत माहिती देणे समाजामध्ये या कायद्यावर जनजागृती करणे आवश्यक असल्याचे नमूद केले प्रत्येकाने परिस्थितीला तोंड दिले पाहिजे तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा 2012 च्या न्यायालयीन प्रक्रिया व अधिनियम यांच्या उद्देशाबाबत माहिती दिली. विद्यार्थिनीने चांगले वाईट ओळखण्याची क्षमता तुमच्या मध्ये विकसित केले पाहिजे, स्वतःला कधी कमी लेखू नये. घरातून बाहेर पडल्यापासून परत घरी जाईपर्यंत आपण सदैव जागरूक कसे असले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच स्पर्शज्ञानाविषयी सविस्तर माहिती सांगितली व सध्याच्या जगात स्वतःची सुरक्षितता कशी घ्यावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

समाजात बालका वरील लैंगिक अत्याचार हे बालकांच्या विश्वातील लोकांकडूनच होत असल्याचे प्रमाण जास्त असल्याचे नमूद करून तुमच्या शरीरावर तुमचाच अधिकार आहे. आपल्या सोबत तुम्ही नाही म्हणायला शिका. जर कोणाकडून आपल्या सोबत घेत होतं घडत असेल तर त्याच वेळीच प्रतिकार केला पाहिजे असे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश कांबळे यांनी मनोगतात सांगितले.

यावेळी प्रशालेचे सर्व पर्यवेक्षक व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मंजिरी हरहरे मॅडम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!