आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पत्नी फॅशनेबल रहात नाही व मेकअप करीत नाही, यासाठी पतीचा पत्नीस नांदविण्यास नकार

Spread the love

सोलापूर:- सोलापुरात खाजगी हॉस्पिटल मधील डॉक्टर पत्नी सौ. सुनयना वय 32 राहणार- जुळे सोलापूर यांनी पती श्री.राजेश वय 35 रा- (व्यवसाय – रोड कॉन्ट्रॅक्टर) रा.- सदर बझार सोलापुर. यांच्याविरुद्ध पतीने डॉक्टर पत्नीस नांदविण्यास घेऊन जाण्याबाबत याचिका पत्नीने अँड. श्रीनिवास कटकुर यांच्यामार्फत सोलापूर येथील मेहरबान. फॅमिली कोर्टात दाखल केला.

*यात केसची सविस्तर हकीकत अशी की* डॉक्टर पत्नीं सौ. सुनयना यांचा व्यवसायाने रोड कॉन्ट्रॅक्टर असलेल्या पती श्री. राजेश यांच्याशी दोन वर्षांपूर्वी सोलापूर येथे मोठ्या मंगल कार्यालयात मोठ्या थाटामाटात पार पडला. व दोघे पती-पत्नी एकत्र तीन महिने चांगले राहिले व तदनंतर पतीने डॉक्टर पत्नीस ,’तू सडपातळ आहेस व तू फॅशनेबल कपडे वापरत नाहीस व तु मेकअप करीत नाही व स्टायलीश राहत नाहीस म्हणून तसेच माहेरुन जास्त सोने व जास्त हुंडा घेऊन ये `, असे पती राजेश सतत पत्नीस टोमणे मारुन व छळ करून पत्नीला माहेरी हाकलुन दिला व डॉक्टर पत्नीस नांदविण्यास सतत नकार देत होता ,त्यासाठी डॉक्टर पत्नी सौ. सुनयना यांनी एस. के लाँ असोसिएटसचे विधिज्ञ अँड. श्रीनिवास कटकुर यांच्यामार्फत सोलापूर येथील मेहरबान. फॅमिली कोर्टात हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 कलम 9 प्रमाणे Restitution Of Conjugal Rights वैवाहीक हक्क पुर्नस्थापित होवुन मिळणेसाठी ची याचिका मे. कौटुंबिक न्यायालयात दाखल केले व या कामी मे.कोर्टाने पती श्री. राजेश यांना नोटीस काढून सुनावणी कामी हजर राहण्याचे आदेश केले.

* *यात डॉक्टर पत्नी तर्फे अँड. श्रीनिवास कटकुर, अँड,. किरण कटकुर, अँड. आकाश आयंची हे काम पाहत आहेत*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!