संमोहन तज्ञ डॉ रविंद्र सोरटे यांच्या वाढदिवसानिमित्त 23 जुलै रविवारी 2 वाजता हॉटेल ऐश्वर्या येथे मोफत हिप्नॉटिझम मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन……..!

सोलापूर:- महाराष्ट्रातील प्रख्यात संमोहन तज्ञ डॉ रविंद्र सोरटे यांच्या वाढदिवसानिमित्त 23 जुलै रविवारी हॉटेल ऐश्वर्या येथे मोफत हिप्नॉटिझम मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
हिप्नॉटिझम अर्थात संमोहन शास्त्र होय,हे आपले भारतीय प्राचीन अध्यात्मशास्त्र आहे. हिप्नॉटिझम हे बाह्यमन आणि अंतर्मन यावर आधारित शास्त्र असून या शास्त्राच्या माध्यमातून अंतर्मनाची 90% शक्ती जागृत केली जाते, आणि या शक्तीचा वापर केला जातो. हिप्नॉटिझम शास्त्राद्वारे मानसिक समस्या आणि मनोशारीरिक समस्यांवर उपचार करता येतो. हिप्नॉटिझम शास्त्राला जागतिक आरोग्य संघटनेने शास्त्र म्हणून मान्यता दिलेली आहे तसेच भारतीय केंद्रसरकारने देखील उपचार पद्धती म्हणून मान्यता दिलेली आहे.मनोविकारतज्ञांच्या उपचारा सोबतच या उपचार पद्धतीचा पूरक उपचार पद्धती म्हणून वापर केल्यास लवकर गुण येतो. संमोहन तज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे गेली तीस वर्षे या क्षेत्रात काम करत असून हिप्नॉटिझम शास्त्राच्या उपचाराने त्यांनी हजारो मानसिक रुग्णांना नवसंजीवनी दिलेली आहे.

संमोहन उपचाराद्वारे मानसिक समस्या दूर करता येतात त्या पुढील प्रमाणे मानसिक समस्या, ताणतणाव,अनामिक भीती, आत्महत्येचे विचार, आत्मविश्वासाची कमतरता, (निद्रानाश) अर्थात झोप न लागणे मानसिक लैंगिक समस्या,भीती, चिंता,काळजी आणि नैराश्यावर उपचार करून अनेक मानसिक रुग्णांना मानसिक दृष्ट्या सक्षम करून त्यांचे जीवन सुखी केले आहे. आपणास वरील प्रकारे त्रास होत असल्यास खचून जाऊ नका किंवा घाबरून जाऊ नका.असे आवाहन संमोहनतज्ञ डॉ अलका सोरटे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी 989090 2086 या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी केल्यास तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन मिळेल.एक सामाजिक सेवा व्हावी यासाठी डॉ.रवींद्र हे तन,मन, धनाने कार्य करीत आहेत.तरी या संधीचा फायदा तमाम जनतेने घ्यावा असे आवाहनही करण्यात आले.



