शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलित,छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुल, जुळे सोलापूर खेळाडू व मार्गदर्शक यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहाने साजरी….!

सोलापूर : शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलित,छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुल, जुळे सोलापूर येथे सर्व खेळाडूंच्या वतीने चंद्रसुर्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुर्यकांत होनमाने व महादेव पुजारी यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सर्व खेळाडूंना संस्थेच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला. यावेळी जुळे सोलापुरातील स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास पांढरे, वसुंधरा कला महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रा. डॉ. सुहास उघडे, विष्णू मारकड, भास्कर बंदपट्टे, किरण स्पोर्ट्सचे संस्थापक अध्यक्ष मोहन रजपूत, खो-खो मार्गदर्शक सदानंद गुजले, क्रिकेट मार्गदर्शक मनोज रायचूरकर, कबड्डी मार्गदर्शक मरगू जाधव व सुवर्णा कांबळे, क्रीडा शिक्षक कोळी, शिकक्षेतर कर्मचारी व खेळाडू उपस्थित होते.



