आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेची नागपूर शहर समितीची मिटिंग दिनांक २३ जून २०२३ रोजी संपन्न

Spread the love

नागपूर:- मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेची नागपूर शहर समितीची मिटिंग दिनांक २३ जून २०२३ रोजी झाली आणि त्यात नारायणा विद्यालयम या शाळेची जागा मराठी साहित्य संमेलन आणि राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी शनिवार दिनांक ३० सप्टेंबर २०२३ या तारखेवर शिक्का मोर्तब करण्यात आले. यंदाचा हा मान नागपूर शहराला मिळाला हे विशेष होय , या मिटिंग मधे नरेंद्र मोहिते ( नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष ), . प्रवीण उपलेंचवार ( नागपूर शहर उपाध्यक्ष ) . रत्नाकर मुळीक ( नागपूर शहर उपाध्यक्ष ) सौ. नीता चिकारे ( नागपूर शहर कार्याध्यक्ष ) आणि वर्धा येथील शिक्षण महर्षि  पंडित शंकर प्रसाद अग्निहोत्री हे उपस्थीत होते. सर्वांनीच हे मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . या संमेलनाचे उद्घघाटन केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी  करणार आहेत हे विशेष होय . लवकरच कार्यक्रमाची रुपरेषा प्रसिद्ध करण्यात येईल असे मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर आणि विदर्भ विभाग प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. नागपूर शहरवासियांनी सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन सिद्धार्थ कुलकर्णी यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!