आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

* के.पी.क्रिकेट अकॅडमी व हरिभाई देवकरण प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या उन्हाळी क्रिकेट शिबिराची सांगता…..!

Spread the love

सोलापूर:- (उपसंपादक रत्नाकर लोंढे याजकडून) के.पी.क्रिकेट अकॅडमी व हरिभाई देवकरण प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या उन्हाळी क्रिकेट शिबिराचा सांगता समारंभ उत्स्फूर्तपणे पार पडला. यावर्षी उन्हाळी क्रिकेट शिबिरासाठी सोलापूर जिल्हा,उस्मानाबाद जिल्हा व लातूर जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी यात भाग घेतला होता. गेली दोन महिने म्हणजे 8 एप्रिल ते 14 जून पर्यंत हा शिबिर श्री प्रकाश कंपली यांच्या मार्गदर्शनाखाली ह.दे.प्रशालेच्या भव्य क्रीडांगणावर यशस्वीपणे पार पाडला.या शिबिरास यावर्षी ग्रामीण भागातून सुद्धा अनेक खेळाडू आले होते.या शिबिरातील मुलांचा व मुलींचा मिळून सुपर किंग्स, सुपर जायंट्स,टायटन्स असे ज्युनिअर गटातून तीन तर फिनीशर्स, स्ट्राईकर्स व ग्लॕडिएटअर्स असे सबज्युनिअर गटातून तीन संघ असे एकूण सहा संघ बनविण्यात आले होते.

यामध्ये ज्युनिअर गटाचे तीन संघ व सबज्युनिअर गटाचे तीन संघ असे विभाग करून त्यांच्यामध्ये साखळी पद्धतीचे सामने खेळवण्यात आले.या साखळी सामन्यातून सब ज्युनिअर गटातून फिनिशर्स या संघाने विजेतेपद पटकाविला.तर ज्युनिअर गटात सुपर किंग्स या संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली व दोन्ही विजेते पद मिळवलेल्या संघास फिरता चषक ह.दे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.प्र.रा.कांबळे सर,तसेच प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी व खेळाडू श्री.प्रशांत बाबर यांच्या हस्ते देण्यात आला.दोन महिने चाललेल्या या शिबिराला एकही दिवस प्रॅक्टिस न बुडविता येणाऱ्या लास्या दासरी या चिमुकलीस उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.


या शिबिरास शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री.प्रशांत बाबर, श्री. प्र.रा.कांबळे सर श्री.हणमंत मोतीबने सर,क्रीडा शिक्षक श्री.माणिक साळसकर सर,श्री.प्रमोद चुंगे सर,डी.एम स्पोर्ट्सचे श्री.सुनील चव्हाण सर,पश्चिम विभागीय खेळाडू श्रीमती.किरण सोनी(मणियार)यांची उपस्थिती होती.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक श्री.अक्षय गवळी सर यांनी केले.
शिबिरातील सर्व खेळाडूंना के.पी.क्रिकेट अकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक श्री.प्रकाश कंपली तसेच त्यांचे सहाय्यक व महिलांचे प्रशिक्षक श्रीमती.किरण सोनी (पश्चिम विभागीय खेळाडू)सारिका कुरनुरकर,वर्षा हक्के,समीर वजीरकर व वैष्णव जावळे ( महाराष्ट्र खेळाडू ) ऐश्वर्या गिरे (विद्यापीठ खेळाडू)चंद्रकांत जाधव,प्रशांत गायकवाड,ओंकार कोरे,सुरज गायकवाड,संकेत काखंडकी व श्रेयस सुरवसे (जिल्हास्तरीय खेळाडू) इत्यादींचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
शिबिर यशस्वीपणे पार पडण्याकरिता श्री.प्रमोद चुंगे सर,माणिक साळसकर सर,अक्षय गवळी सर , राघवेंद्र पिल्ले, अरविंद नडखांबे, राजकुमार पुजारी, सुमित गाडेकर यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!