आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एस.के. फाऊंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्यफाऊंडेशनचे अध्यक्ष अँड. श्रीनिवास कटकूर यांच्या हस्ते वाटप …..!

Spread the love

सोलापूर:- येथील एस.के. फाऊंडेशन च्या वतीने गरीब होतकरू आणि हुशार मुलींना शिक्षणांत अडचण येऊ नये म्हणून काँलेज बँग, , वह्या , बाॅलपेन्स, कंपास सेट असे शैक्षणिक साहित्य फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड. श्रीनिवास कटकूर यांच्या हस्ते देण्यांत आले.

यावेळी अँड. श्रीनिवास कटकूर मार्गदर्शन करताना म्हणाले की, आम्ही विदयार्थ्यांच्या सर्वांगिण विकास व्हावा मुलीना पुढील शिक्षण घेताना अडचणी येऊ नये म्हणून विविध उपक्रम राबवित आहोत. मुलींनी शैक्षणिक साहित्याचा उपयोग करून शिक्षण घेऊन आईवडीलांचे तसेच समाजाचे आणि आपल्या शहराबरोबर देशाचे नांव उज्वल करावे असे आवाहन केले. यावेळी फाऊंडेशनचे सचिव यशवंत इंदापुरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमांस नागेश बोमड्याल,राजू मॅडम, सपना मॅडम,संध्या मॅडम, प्रणिती मॅडम,निशा मॅडम , अंबादास यलगेटी शाहू बिते तसेच त्या भागातील पालक ,नागरीक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!