*नांदेडच्या शिक्षण विभागाचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणल्यामुळे A.R. न्यूज नेटवर्क व विशेष प्रतिनिधी सखाराम कुलकर्णी यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव*

सोलापूर– नांदेडच्या शिक्षण विभागाचा तसेच वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचा गैर कारभार भ्रष्ट कारभार, मिली जुली कारभाराचे सत्य वृत्त आमचे विशेष प्रतिनिधी सखाराम कुलकर्णी यांनी चव्हाट्यावर आणल्यामुळे नांदेड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही आमच्या A.R. न्यूज नेटवर्क वर अभिनंदनाचा वर्षाव होऊन शिक्षण विभागाचे अजून कोणते कोणते भ्रष्ट कारभार आहेत ते सांगण्यास अन्यायग्रस्त शिक्षक एक एक जन फोनवर संपर्क करून आपली व्यथा सांगत होता. नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा काळाबाजार जोमात चालू असून एक एक प्रकरण उजेडात येत आहेत. टी ई टी चा मोठा घोटाळा उजेडात आला. अहमदनगर जिल्ह्यात 825 शिक्षकांची बोगस भरती सामाजिक कार्यकर्ते रमेश बाहेती यांच्यामुळे उघडकीस आली. त्यात नांदेड जिल्हा भ्रष्ट कारभारात मागे नाही हे कालच्या वृत्तावरून सर्वांच्या लक्षात आले आहे. येथील दोन्ही (प्राथमिक व माध्यमिक) शिक्षणाधिकाऱ्यांनवर गुन्हे दाखल असून एकावर लाच लूचपत विभागाचे गुन्हे तर दुसऱ्यावर इतर काही गैरकाम केले असल्यामुळे गुन्हे दाखल आहेत. असे गुन्हे असलेले शिक्षणाधिकारी नांदेडला लाभलेले आहेत तर यांचेकडून चांगल्या व पारदर्शक कामाची काय अपेक्षा करावी अशी खंत काही अन्यायग्रस्त शिक्षकांनी आमचे प्रतिनिधी जवळ बोलून दाखवली.
शिक्षणाधिकाऱ्यांना गैर व भ्रष्ट काम करण्यास प्रोत्साहन देणारे त्यांचेच वरिष्ठ म्हणजे शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक हेच आहेत. असेही काही जण बोलून दाखवत होते. कारण नांदेडच्या शिक्षण विभागाच्या गैर कारभाराच्या कित्येक तक्रारी शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक पुणे यांचे कडे पुराव्यासह गेल्यात पण हे वरिष्ठ अधिकारी याची दखल घेत नाहीत व चौकशी पण करत नाहीत अशी बिकट अवस्था पवित्र समजल्या जाणाऱ्या शिक्षण विभागाची झाली आहे .काल प्रकाशित झालेल्या कै. लक्ष्मणराव पाटील हसेकर शाळेच्या भ्रष्ट कारभारा च्या तक्रारी तेथील किशोर पाटील व ग्रामस्थांनी शिक्षणाधिकारी नांदेड शिक्षण संचालक पुणे शिक्षण मंत्री मुंबई यांचे पर्यंत केल्या व यांच्या गैर कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली पण शिक्षणाधिकारी व संस्थेचे संगणमत असल्यामुळे काहीही कारवाई होत नाही अशी खंत किशोर पाटील यांनी आमच्याकडे व्यक्त केली.
व या शाळेचे अजून बरेच गैरकारभार सांगितले. नांदेड जिल्ह्यात शिक्षणाधिकारी व वेतन पथक विभागाचे अधीक्षक हे संगणमत करून काही शाळा आपल्या हातात घेऊन शालेय पोषण आहार, शिक्षक भरती काही शिक्षकांचे मागील थकीत वेतन काढणे असे काम करून शासनाची तिजोरी रिकामी करतात .व यांच्या तीन-चार वर्षांच्या कार्यकाळात टोलेजंग तीन तीन कोटीचे बंगले उभे राहतात .असेही समजले .नांदेडचा अशा भ्रष्ट कारभार आम्हाला सांगण्यास बरेच जण पुढे येत आहेत व आमच्या A.R. न्यूज च्या बातम्या अन्यायाला भ्रष्टाचाराला वाचा फोडणाऱ्या असतात असे म्हणून आमचे वर अभिनंदनचा वर्षाव करत आहेत.
नांदेडच्या शिक्षण विभागाच्या गैर कामाचे पुरावे आमचे कडे येत आहेत त्याचे वृत्त लगेच न्यूज नेटवर्क वर आपल्याला दिसेल.



