श्री नीलकंठेश्वर मंदिर मध्ये जांड्रा समाजातील हुशार , होतकरू व गरजु विद्यार्थ्यांना समाजातील दानशूर व्यक्तीकडून *”मोफत वह्या वाटप

सोलापूर:- साखर पेठ, येथील श्री नीलकंठेश्वर मंदिर मध्ये जांड्रा समाजातील हुशार , होतकरू व गरजु विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना समाजातील दानशूर व्यक्ती यांच्याकडून*”मोफत वह्या वाटप”* या क्रार्यक्रमाचे आयोजनकरण्यात आले होते. सदर
कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्ञाती संस्थेचे सचिव सत्यनारायण द्यावरकोंडा यांनी भूषविले व प्रमुख पाहुणे म्हणून महेश अण्णा कोठे होते.
यावेळी समाजातील निलम नगर, गोदुताई घरकुल, जुना घरकुल , सुनिल नगर, घोंगडे वस्ती या भागातील जवळपास 150 विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी महेश कोठे, दिनानाथ धुळम, शंकर बटगिरी व श्री सत्यनारायण दयावरकोंडा यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास विश्वस्त दिनानाथ धूळम, राजेन्द्र द्यावरकोंडा, राजू कामुर्ती, शंकर बटगिरी, श्रीनिवास बंदगी, अनिल धूळम, सुदर्शन मादगुंडी,श्रीनिवास कामुर्ति, हणमंतू मिठ्ठा, सतिश कुनी, लखन रुमांडला, महेश येज्जा, अंबादास गवनी, अमन मुटकीरी,विनायक मिठ्ठा, रमेश म्हंताटी, नरसिंग म्हंता आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमास मोठया प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.
या क्रार्यक्रमाचे सुत्र संचालन श्रीनिवास बंदगी यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन सतीश कुनी यांनी मानले.



